Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

२८ दिवसांच्या रिचार्जला ब्रेक! ३० दिवसांचा पर्याय खुला; मोबाईल ग्राहकांसाठी TRAIचा मोठा बदल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 29 September 2026, 10:58

डॉ. अशोक बालगुडे

नवी दिल्ली: मोबाईल रिचार्जच्या २८ दिवसांच्या वैधतेमुळे वर्षाला १३ वेळा रिचार्ज करण्याची वेळ येत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारींना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) २२ सप्टेंबर २०२६ रोजी दूरसंचार ग्राहक संरक्षण नियमांत सुधारणा केली असून, ग्राहकांना अधिक लवचिक वैधता पर्याय उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नव्या नियमांनुसार दूरसंचार कंपन्यांना केवळ व्हॉइस आणि एसएमएस सेवांसाठी स्वतंत्र विशेष टॅरिफ व्हाउचर (STV) उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. त्यामुळे इंटरनेट डेटाची गरज नसलेल्या ग्राहकांना अनावश्यक डेटा असलेला महागडा पॅक घेण्याची गरज कमी होणार आहे. तसेच ग्राहकांच्या गरजेनुसार ३० दिवसांच्या वैधतेचा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

२८ दिवसांच्या रिचार्जचा मुद्दा आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी संसदेत उपस्थित केला होता. २८ दिवसांच्या वैधतेमुळे ग्राहकांना कॅलेंडर वर्षात १२ ऐवजी १३ वेळा रिचार्ज करावा लागतो, असा मुद्दा त्यांनी मांडला होता. TRAIच्या नव्या सुधारणांनंतर चड्ढा यांनी केंद्र सरकार आणि TRAIचे आभार मानले आहेत.

मात्र, सर्व २८ दिवसांचे रिचार्ज बंद करून प्रत्येक ग्राहकाला अनिवार्यपणे ३० दिवसांचा प्लॅन द्यावा, असा आदेश TRAIने दिलेला नाही. नव्या नियमांचा भर ग्राहकांना अधिक पर्याय देण्यावर आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कोणत्या कंपन्या कोणते ३० दिवसांचे किंवा मासिक वैधतेचे प्लॅन आणतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

 

नव्या नियमांमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, फीचर फोन वापरणारे आणि इंटरनेटचा अत्यल्प वापर करणाऱ्या ग्राहकांना फायदा होण्याची शक्यता आहे. त्यांना फक्त कॉलिंग आणि एसएमएससाठी आवश्यक असलेली सेवा स्वतंत्रपणे निवडता येईल.
TRAIने जारी केलेल्या ‘Telecom Consumers Protection (13th Amendment) Regulations, 2026’नुसार हे बदल अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांनी लागू होणार आहेत. त्यामुळे नियम जाहीर झाले असले तरी त्यांचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी दूरसंचार कंपन्यांना आपल्या प्लॅन्समध्ये आवश्यक बदल करावे लागणार आहेत.

२८ दिवसांचा हिशेब की ग्राहकांचा हक्क? हा प्रश्न आता नव्या नियमांमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार सेवा निवडण्याचा आणि त्यासाठी योग्य किंमत मोजण्याचा पर्याय मिळणे, हेच या बदलाचे खरे यश ठरणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंड येथील भीमा नदीकाठी रंगला ‘तीन पानी’चा डाव; 5 जणांना पोलिसांनी पकडलं रंगेहाथ

Tuesday, 29 September 2026, 11:16

मनोज जरांगेंवर महिलेचा गंभीर आरोप! ‘जेव्हा वेळ येईल तेव्हा मी सत्य बोलेन’ म्हणत डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

Tuesday, 29 September 2026, 11:11

२८ दिवसांच्या रिचार्जला ब्रेक! ३० दिवसांचा पर्याय खुला; मोबाईल ग्राहकांसाठी TRAIचा मोठा बदल

Tuesday, 29 September 2026, 10:58

९० कोटींच्या टेंडरवरून पुण्यात खळबळ! संतापलेल्या आमदाराची डायरेक्ट महापालिका आयुक्तांना गुन्ह्यात अडकवण्याची धमकी

Tuesday, 29 September 2026, 10:50

चुलत भावाकडून घेतलं Instagram अकाऊंट, नाव बदललं अन् पुढे केतनला लोहगडावर बोलावलं; चार्जशीटमध्ये काय?

Tuesday, 29 September 2026, 10:48

स्वामी चिंचोलीत महामार्गावर दोन दुचाकींची जोरदार धडक! पती-पत्नी जखमी; भिगवण येथील चालकाविरुद्ध दौंड पोलिसांत गुन्हा दाखल

Tuesday, 29 September 2026, 10:42
Next Post

मनोज जरांगेंवर महिलेचा गंभीर आरोप! 'जेव्हा वेळ येईल तेव्हा मी सत्य बोलेन' म्हणत डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp