Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

९० कोटींच्या टेंडरवरून पुण्यात खळबळ! संतापलेल्या आमदाराची डायरेक्ट महापालिका आयुक्तांना गुन्ह्यात अडकवण्याची धमकी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 29 September 2026, 10:50

पुणे : पुणे महापालिकेच्या सुमारे ९० कोटी रुपयांच्या रस्ता प्रकल्पाच्या निविदेवरून एका आमदाराने महापालिका आयुक्तांना धमकी दिल्याचा आरोप समोर आला आहे. ‘तुम्हाला गुन्ह्यात अडकवतो’, अशी धमकी आयुक्तांना देण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, पथ विभागातील अधिकाऱ्यांनाही विधानसभेत हक्कभंग आणण्याची धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकाराला आयुक्त नवलकिशोर राम यांनी दुजोरा दिला असून संबंधित आमदाराचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला.

आरटीओ चौक ते बंडगार्डन पूल परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुळा-मुठा नदीच्या कडेने १७ मीटर रुंद आणि सुमारे दोन किलोमीटर लांबीचा वेलस्ली रस्ता विकसित करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. या कामासाठी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निविदा काढण्यात आली होती. त्यात आठ ठेकेदार सहभागी झाले होते.

निविदा प्रक्रियेत एका पात्र ठेकेदाराला अपात्र ठरवून आपल्या पसंतीच्या ठेकेदाराला काम मिळावे, यासाठी संबंधित आमदाराने महापालिका प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप आहे. या कथित हस्तक्षेपामुळे निविदा प्रक्रिया सुमारे सात महिने रखडल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, निविदा प्रक्रिया बराच काळ प्रलंबित राहिल्यानंतर महापालिका आयुक्तांनी नियमानुसार प्रक्रिया पुढे नेण्याचे आणि संबंधित ठेकेदारांच्या पात्रता-अपात्रतेबाबत कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर करण्यात आलेल्या छाननीत आमदारांकडून अपात्र ठरविण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा दावा असलेला ठेकेदार पात्र ठरला.

विशेष म्हणजे, संबंधित पात्र ठेकेदाराने आमदारांच्या पसंतीच्या ठेकेदाराच्या तुलनेत सुमारे नऊ कोटी रुपये कमी खर्चाची निविदा सादर केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या निधीची बचत झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

आपल्या पसंतीच्या ठेकेदाराला काम मिळाले नसल्याने संबंधित आमदाराने आयुक्तांना फोन करून धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच पथ विभागातील अधिकाऱ्यांनाही दमबाजी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकारामुळे महापालिका प्रशासनात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

फुरसुंगीतील विजेच्या समस्या सुटता सुटेनात अन् लोणी काळभोरला पूर्णवेळ वीज भेटेना!

Sunday, 25 October 2026, 21:31

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे आता होणार अधिक कठीण! उत्तीर्ण होण्यासाठी ६० ऐवजी थेट ‘एवढे’ टक्के गुण अनिवार्य

Sunday, 25 October 2026, 21:19

पुण्यात ‘भाईगिरी’चा खळबळजनक प्रकार! ‘आज याला जिवंत सोडायचे नाही’ म्हणत १६ वर्षीय मुलावर कोयत्याने भीषण वार

Sunday, 25 October 2026, 21:13

बारामतीत लाचलुचपत विभागाची धडक कारवाई; ६ हजारांची लाच घेताना वनपाल रंगेहात जाळ्यात

Sunday, 25 October 2026, 20:02

इंदापूरच्या भक्ती बोराटेची भरारी! ४०० मीटर हर्डल्समध्ये जिल्ह्यात प्रथम; विभागीय स्पर्धेसाठी निवड

Sunday, 25 October 2026, 19:51

पोलीस चौकशीला घाबरून राणा सूर्यवंशीने रुग्णालयातून ठोकली धूम? पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार; पोलिसांच्याकडून तोंडावर बोट..

Sunday, 25 October 2026, 19:46
Next Post

२८ दिवसांच्या रिचार्जला ब्रेक! ३० दिवसांचा पर्याय खुला; मोबाईल ग्राहकांसाठी TRAIचा मोठा बदल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp