Monday, August 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ओबीसी आरक्षणाला 50 टक्क्यांची मर्यादा; 15 जिल्ह्यांतील 512 सरपंचपदे खुल्या प्रवर्गात..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 17 August 2026, 18:31

पुणे, ता. 17 : ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा सुधारित आदेश काढला आहे. ओबीसी आरक्षणाची एकूण मर्यादा 50 टक्क्यांच्या आत ठेवण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर 15 जिल्ह्यांतील सरपंचपदांच्या आरक्षणात मोठा बदल करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ओबीसींसाठी आरक्षित असलेली तब्बल 512 सरपंचपदे कमी होऊन ती खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आली आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने 30 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायतींमधील आरक्षण 50 टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ग्रामविकास विभागाने संबंधित 15 जिल्ह्यांतील सरपंचपदांच्या आरक्षणाचा फेरआढावा घेत सुधारित आदेश जारी केला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या 13 जून 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार संबंधित 15 जिल्ह्यांमध्ये ओबीसींसाठी 6,719 सरपंचपदे आरक्षित करण्यात आली होती. त्यापैकी 3,373 पदे महिलांसाठी राखीव होती. मात्र सुधारित आरक्षणानुसार आता ओबीसींसाठी केवळ 6,207 सरपंचपदे राखीव राहणार आहेत. यामध्ये 3,111 पदे महिलांसाठी राखीव असतील. यामुळे ओबीसी आरक्षणातील 512 सरपंचपदे कमी झाली आहेत.

दरम्यान, ओबीसींची कमी झालेली 512 पदे आता खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आली आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील सरपंचपदांची संख्या 13,077 वरून थेट 13,589 झाली आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव पदांची संख्या देखील 6,541 वरून 6,803 करण्यात आली आहे. हा सुधारित आदेश धुळे, जळगाव, हिंगोली, नांदेड, लातूर, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या 15 जिल्ह्यांना लागू आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली असली तरी जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ओबीसींसाठी स्वतंत्र जात रकाना नसल्याने प्रत्यक्ष जातनिहाय गणना कशी होणार, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा कायम ठेवण्याचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

 

एकूणच, आगामी ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी झालेल्या या आरक्षण फेरबदलामुळे 15 जिल्ह्यांतील इच्छुक उमेदवारांच्या राजकीय गणितावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात तोतया पत्रकारांचा कारनामा! ‘तू लहान मुलींचे गर्भपात करतो, तुझी बातमी लावतो’ डॉक्टरला धमकी देत खंडणीची मागणी

Monday, 17 August 2026, 18:46

ओबीसी आरक्षणाला 50 टक्क्यांची मर्यादा; 15 जिल्ह्यांतील 512 सरपंचपदे खुल्या प्रवर्गात..

Monday, 17 August 2026, 18:31

पुण्यात १४ दिवसांसाठी महा-जमावबंदी लागू! मोर्चे, निदर्शने अन् सोशल मीडियावरील रिल्सवर थेट बंदी; नव्या आदेशामुळे शहरात खळबळ

Monday, 17 August 2026, 17:56

पुण्यात PMPML बसचा थरार! भररस्त्यात बस पेटली; धुराचे लोट पसरले अन् लोकांची पळापळ; पहा व्हायरल VIDEO

Monday, 17 August 2026, 17:35

PMRDA ची नोटीस धाब्यावर बसवून उरुळी कांचनमध्ये 40 खोल्यांचे बेकायदा बांधकाम सुरूच ; अधिकारी ‘मॅनेज’ झाल्याचा झोपडपट्टी सुरक्षा दलाचा गंभीर आरोप..

Monday, 17 August 2026, 17:25

रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये आरएसपी ट्रूपची नेत्रदीपक परेड अन् कराटे प्रात्यक्षिकांनी जिंकली मने..

Monday, 17 August 2026, 16:59
Next Post

पुण्यात तोतया पत्रकारांचा कारनामा! 'तू लहान मुलींचे गर्भपात करतो, तुझी बातमी लावतो' डॉक्टरला धमकी देत खंडणीची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.