उरुळी कांचन, (पुणे) : पुणे जिल्ह्यातील पूर्व हवेली भागातील मुलांच्या बौद्धिक क्षमतेला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख मिळाली आहे. उरुळी कांचन, लोणी काळभोर आणि शेवाळेवाडी परिसरात प्रसिद्ध ॲबॅकस ॲकॅडमी म्हणून नावारूपाला आलेल्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टर’ (NiBM) चे 5 ते 16 वयोगटातील तब्बल 12 विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहेत.

यापैकी उरुळी कांचन येथील अवघ्या 12 वर्षीय साई पल्लवी मयूर जगताप याने आपल्या विलक्षण स्मरणशक्तीच्या जोरावर ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ (Asia Book of Records) मध्ये नोंद करत “Grand Master” ही मानाची पदवी पटकावून उरुळी कांचनसह संपूर्ण महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे.

उरुळी कांचन येथील ‘स्वामी विवेकानंद अकॅडमी’ CBSE त शिकणाऱ्या साई जगताप याने वयाच्या 12 वर्षे 6 महिने वयात असताना एक अद्भूत पराक्रम साकारला. त्याने अवघ्या 52 सेकंदांच्या कालावधीत 49 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांची (Airlines) नावे आणि त्यांच्याशी संबंधित देशांची नावे तंतोतंत व अचूक सांगून सर्वांना थक्क केले. हा अद्वितीय विक्रम ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टर’ (NiBM), पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला. साईच्या या थक्क करणाऱ्या बौद्धिक कौशल्याची दखल घेत ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने त्याला अधिकृतपणे “ग्रँड मास्टर” पदवीने सन्मानित केले आहे.

याआधी साई जगताप याच्या नावावर ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ची (India Book of Records) नोंद झाली होती. त्यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मा. खासदार मुरलीधर मोहळ यांच्या हस्ते पुणे येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात साईचा सन्मान करण्यात आला होता. आता आशिया स्तरावर मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल 2026 मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या “Asia Book of Records” च्या भव्य दीक्षांत समारंभात (Convocation Program) साईचा विशेष सन्मान केला जाणार आहे.
साईच्या या अभिमानास्पद आणि ऐतिहासिक यशाबद्दल त्याचे पालक, शिक्षक, स्वामी CBSE अकॅडमीचे व्यवस्थापन, तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टर (NiBM) च्या वतीने त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
दरम्यान, यासाठी NIBM (National Institute of Brain Master) च्या लोणी काळभोर, उरुळी कांचन किंवा शेवाळवाडी शाखेला भेट द्यावे असे NIBM चे संचालक नवनाथ हंबीर यांनी सांगितले. तसेच 9009008057 या नंबरवरती संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(जाहिरात पुरस्कृत)







