Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई; गुंड टिपू पठाणच्या घरझडतीत लाखोंचं घबाड हाती

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 8 October 2025, 20:08
Pune Crime: Major police action in Pune; Lakhs of cash seized in raid on gangster Tipu Pathan's house

Photo-Social Media

पुणे: शहरात पुन्हा एकदा (Pune Crime) गुन्हेगार टोळ्यांचे वर्चस्व वाढत असल्याचे चित्र समोर येत असतानाच पुणे पोलिसांनी (Pune Police) त्यांच्या आर्थिक स्रोतांवर गदा आणण्याची मोहीम हाती घेतली आहे. आंदेकर टोळीच्या अवैध आर्थिक स्रोतांवर आळा घातल्यानंतर आता कुख्यात टिपू पठाण टोळीवर (Tipu Pathan Gang) पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.

हडपसर परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे जागा बळकावून, बेकायदेशीर बांधकाम करून आणि नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या या टोळीविरुद्ध मंगळवारी काळेपडळ पोलिस ठाण्याच्या पथकाने मोहीम राबवली. या कारवाईत प्रमुख संशयित रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण आणि त्याच्या साथीदारांची बँक खाती गोठवण्यात आली. त्याचबरोबर अनधिकृत बांधकामे पाडण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.

या प्रकरणात आरोपी टिपू पठाणसह सादिक कपूर, एजाज पठाण, मेहबूब शेख, जावेद शेख आणि मुनीर शेख यांच्या बँक खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामधील संशयास्पद व्यवहारांची चौकशी गुन्हे शाखा करत आहे. पोलिसांनी तपासादरम्यान आरोपींच्या घरांची झडती घेतली असता, एसी, टीव्ही, फ्रिज, फर्निचर, वॉशिंग मशिन अशा तब्बल 4 ते 5 लाख रुपये किमतीच्या वस्तू आढळल्या. मात्र त्यांची खरीदीची बिले सादर करण्यात कुटुंबीय अपयशी ठरले. त्याचबरोबर दोन नोटरीकृत साठेखतदेखील सापडली असून, त्यांच्या सत्यतेचा तपास सुरू आहे.

पोलिसांनी टिपू पठाणच्या नावावरील लाखो रुपये किमतीची इनोव्हा कारही जप्त केली आहे. ही कार 30 एप्रिलपासून वाघोली येथील टोयोटा शोरूममध्ये सर्विसिंगसाठी ठेवलेली होती.

या टोळीने हडपसरमधील 11 गुंठे जागेची बनावट कागदपत्रे तयार करून ती मालमत्ता बळकावली. जागेवरील कंपाऊंड तोडून त्यांनी बेकायदेशीर बांधकाम उभारलं आणि ती जागा इतरांना वापरासाठी देऊन मोठा आर्थिक फायदा मिळवला. महापालिकेचे पथक आता या अनधिकृत बांधकामांवर पाडकाम करत आहे.

या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील आणि पोलिस निरीक्षक अमर काळंगे यांच्या पथकाने केले. डॉ. शिंदे म्हणाले, “बनावट दस्तऐवजांच्या आधारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांवर कोणताही सौम्यपणा दाखवला जाणार नाही. अशा सर्व गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.”

हडपसरमधील या फसवणूक प्रकरणामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले होते. मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा मिळाला असून, पोलिसांच्या धडक मोहिमेचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘राणा’ने महाराष्ट्रातील प्रसिद्ध संगीतकार-गायक जोडीलाही लावला करोडो रुपयांचा चुना? स्वत:वरील हल्ल्याचा सूत्रधारही राणाच असल्याची चर्चा; पोलीस अभय देणार की सहआरोपी करणार? राज्याचे लक्ष!

Sunday, 25 October 2026, 12:45

उरुळी कांचन येथे भरधाव स्विफ्टची ज्येष्ठ महिलेला धडक; उपचार खर्च देण्याचे आश्वासन देऊनही कारमालक न आल्याने तक्रार दाखल

Sunday, 25 October 2026, 12:29

उरुळी कांचन येथे तरुणाला चौघांकडून मारहाण; नायगाव रॉयल कॉलनीतील मयूर चिकन सेंटरसमोरील घटना

Sunday, 25 October 2026, 11:56

पुणे-सोलापूर हायवेवर ‘थार’वाल्या दारुड्यांचा धुडगूस!उरुळी कांचनजवळ ट्रॅव्हल्स अडवून तोडफोड ; संतप्त नागरिकांनी दोघांना तुडवले

Sunday, 25 October 2026, 11:16

करंदीतील चासकमान कालव्यात अज्ञाताने टाकली सहा मृत डुकरे ; ग्रामपंचायतीकडून विल्हेवाट

Sunday, 25 October 2026, 11:03

पुणेकरांवर पाणीकपातीचं मोठं संकट! मागणीच्या निम्मंच पाणी मिळणार; महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय समोर

Sunday, 25 October 2026, 10:22
Next Post
Pune Crime: Bold action by the black-clad police! Thief who stole 2 rickshaws and a tire in 24 hours arrested

Pune Crime: काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 24 तासांत 2 रिक्षा आणि टायर चोरी करणारा चोरटा गजाआड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp