Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांवर पाणीकपातीची कुऱ्हाड! थेंब-थेंब पाण्यासाठी करावी लागणार मोठी कसरत; धरणांत फक्त 5 टीएमसी साठा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 9 June 2026, 14:32

पुणे: मान्सून उशिरा दाखल होत असल्याने आणि खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्यामुळे पुणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने 15 जूनपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर मंजूषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. नव्या पाणीपुरवठा वेळापत्रकाबाबतचे सविस्तर परिपत्रक पुढील दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये मिळून सध्या केवळ 5.01 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. पुढील तीन महिने पिण्याच्या पाण्याची गरज, आषाढी वारीसाठी लागणारे पाणी तसेच शेतीसाठी आवश्यक पाण्याचा विचार करता उपलब्ध साठ्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. बैठकीला उपमहापौर परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते नीलेश निकम, काँग्रेसचे गटनेते चंदू कदम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर आणि पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप उपस्थित होते.

 

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले की, ज्या भागांमध्ये आधीपासूनच कमी दाबाने किंवा एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे, त्या ठिकाणी अतिरिक्त कपात केली जाणार नाही. हडपसर, काळेपडळ, कोल्हेवाडी, नांदोशी, महंमदवाडी, शिवाजीनगरमधील काही भाग, भाग्योदयनगर, कोंढवा आणि धायरी या परिसरांना याचा दिलासा मिळणार आहे.

पाण्याची बचत करण्यासाठी शहरातील वाहन धुलाई केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहन धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई करण्यात आली असून बांधकाम प्रकल्पांनाही पिण्याच्या पाण्याचा वापर करता येणार नाही. उद्याने आणि बांधकामांसाठी शुद्ध केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच खासगी आणि व्यावसायिक जलतरण तलावांवर निर्बंध घालण्यात येणार आहेत. विहिरी आणि कूपनलिकांचे सर्वेक्षण करून पर्यायी जलस्रोतांचा वापर वाढविण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

सध्या खडकवासला धरणात 0.84 टीएमसी (42.33 टक्के), पानशेतमध्ये 2.27 टीएमसी (21.36 टक्के), वरसगावमध्ये 1.90 टीएमसी (14.82 टक्के) तर टेमघर धरणात पाणीसाठा शून्य आहे. चारही धरणांतील एकूण साठा 5.01 टीएमसी म्हणजेच 17.19 टक्के इतकाच राहिला आहे.

दरम्यान, अनुकूल हवामानामुळे मान्सूनने सोमवारी रत्नागिरी जिल्ह्याचा आणखी काही भाग व्यापत मध्य महाराष्ट्रातील सोलापूरपर्यंत प्रगती केली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत राज्यातील आणखी काही भागांत मान्सून पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र पुणेकरांना अद्याप मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा असून पुढील दोन दिवस दुपारनंतर आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लंडनमधून फिरवतो पुण्याची सूत्र! ‘या’ ॲपवरून गुपचूप करायचा संपर्क; घायवळ बंधूंबद्दल धक्कादायक खुलासा

Wednesday, 10 June 2026, 14:24

जास्त प्रवाशांना बसवल्याने गोदावरीत बोट उलटली अन् 50 जण

Wednesday, 10 June 2026, 14:24

पूर्व पुण्यातील पाणीकपात रद्द; नागरिकांना दिलासा

Wednesday, 10 June 2026, 14:10

सासरच्या छळाला कंटाळून डाळिंब येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासू-सासऱ्यासह 6 जणांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल

Wednesday, 10 June 2026, 13:43

लोणी काळभोर येथील भरतनाट्यम ग्रुप देशात प्रथम, विद्यार्थ्यांची डान्स स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी

Wednesday, 10 June 2026, 13:30

कामगाराने मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून मालकाला बेदम मारहाण, दूध डेअरीवर केला हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 10 June 2026, 13:16
Next Post

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! खरेदीसाठी सुवर्णसंधी; किंमती 2 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.