Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे रेल्वे स्थानकात मध्यरात्री तिकिट केंद्रातील कर्मचाऱ्यावर चाकूने वार; 4.91 लाखांचा मुद्देमाल लंपास..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 19 August 2026, 19:04

पुणे, ता. 19 : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील तिकिट विक्री केंद्रात मध्यरात्री धक्कादायक लुटीचा प्रकार घडला. तिकिट विक्रीतून जमा झालेली रोकड घेऊन मुख्य कार्यालयाकडे निघालेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला दोन चोरट्यांनी अडवून चाकूचा धाक दाखवला. विरोध केल्यानंतर झालेल्या झटापटीत चोरट्यांनी कर्मचाऱ्याच्या हातावर चाकूने वार करून त्याला जखमी केले. त्यानंतर सोनसाखळी, मोबाइल आणि रोकड असा तब्बल 4 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले.

या घटनेत केल्विन सोलोमन मायला (वय 29, रा. धायरकर कॉलनी, मुंढवा) हे जखमी झाले आहेत. त्यांनी याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केल्विन हे पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील तिकिट केंद्रात कार्यरत आहेत. मंगळवारी (१८ ऑगस्ट) मध्यरात्री सुमारे एकच्या सुमारास ते तिकिट विक्रीतून जमा झालेली रोकड मुख्य कार्यालयात जमा करण्यासाठी घेऊन जात होते. याच वेळी तिकिट केंद्राजवळ दबा धरून बसलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी केल्विन यांच्या गळ्याला चाकू लावत त्यांना पुन्हा तिकिट केंद्राच्या दिशेने नेले. त्यानंतर त्यांच्याकडील ऐवज हिसकावण्याचा प्रयत्न केला. केल्विन यांनी प्रतिकार केल्याने झटापट झाली. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या हातावर चाकूने वार केला.

यानंतर चोरट्यांनी केल्विन यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांची सोनसाखळी, 26 हजार 685 रुपयांची रोकड आणि दोन मोबाइल संच असा एकूण 4 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. एवढ्यावरच न थांबता चोरट्यांनी केल्विन यांचे हात-पाय बांधून त्यांच्या तोंडात रुमाल कोंबला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

 

दरम्यान, काही वेळाने तिकिट केंद्रात जखमी अवस्थेत केल्विन पडल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी केल्विन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09

सियाचे २ बॉयफ्रेंड, हबी-वायफीचे मेसेज अन् ‘तुझं तोंड बंद ठेव नाहीतर’ मैत्रिणीला दिलेली धमकी; सिया गोयलचे नवे कारनामे समोर…

Sunday, 4 October 2026, 16:48

“मदतीपासून शेतकरी वंचित राहू नये” माजी गृहमंत्री वळसे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Sunday, 4 October 2026, 16:34

‘दादांचं नाव न वापरता स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवा’ सुनेत्राताईंचं आव्हान; “मी अजित पवारांचे नाव वापरणारच” नेत्याचं प्रतिउत्तर

Sunday, 4 October 2026, 16:17

‘पेपर फोडणारे चिलट; त्यामागचा आका पकडा’; बाळासाहेब थोरातांचा घणाघात

Sunday, 4 October 2026, 16:14

शेतकऱ्यांनो PM किसानचा हप्ता येण्यापूर्वी पोर्टलवरील ‘हे’ नवीन बदल तपासा अन्यथा बंद होईल हप्ता; घरबसल्या करा ऑनलाइन अपडेट

Sunday, 4 October 2026, 16:03
Next Post

अभिजीत दीपकेंची मोठी मागणी! PM CARES Fund मधील ₹8,452 कोटींच्या हिशोबावर थेट सवाल; नेमकं प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp