Saturday, August 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार! राज्यातील २२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 31 July 2026, 22:26

पुणे: राज्यातील रखडलेल्या 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने निवडणुका घेण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेनंतर डिसेंबरमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ओबीसी आरक्षणासह एकूण आरक्षणाची 50 टक्क्यांची घटनात्मक मर्यादा ओलांडल्यामुळे राज्यातील 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुका दीर्घकाळ रखडल्या होत्या. जानेवारीमध्ये 12 जिल्हा परिषदांसाठी मतदान पार पडले, मात्र उर्वरित जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू होऊ शकली नव्हती. आता सरकारने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा कायम ठेवत निवडणुका घेण्याची भूमिका न्यायालयात मांडल्याने या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.

नव्या आरक्षण आराखड्यानुसार अनेक जिल्ह्यांतील आरक्षित जागांच्या संख्येत बदल होऊ शकतो. याचा सर्वाधिक परिणाम ओबीसी आरक्षणावर होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, नागपूर जिल्हा परिषदेत पूर्वी 33 आरक्षित जागा होत्या. नव्या आराखड्यानुसार त्या सुमारे 27 पर्यंत कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

जिल्हा परिषदांसोबतच मुदत संपलेल्या 105 नगरपंचायती आणि सुमारे 12 हजार ग्रामपंचायतींच्याही निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षअखेरीस राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, विविध राजकीय पक्षांनीही निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे. जानेवारीत झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीने चांगली कामगिरी केली होती. आता उर्वरित जिल्ह्यांमध्ये, विशेषतः विदर्भात, काँग्रेससाठी कामगिरी सुधारण्याची संधी मानली जात आहे. ठाणे आणि पालघर जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यातही चुरशीची लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

या निवडणुका पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, बीड, जालना, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 22 जिल्हा परिषदांमध्ये होणार आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

राज्यात पावसाचा जोर कायम; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी ….

Friday, 31 July 2026, 22:54

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार! राज्यातील २२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

Friday, 31 July 2026, 22:26

ई-20 पेट्रोलमुळे जुन्या गाड्यांचे नुकसान होणार? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची संसदेत मोठी कबुली!

Friday, 31 July 2026, 21:55

थेऊरच्या ‘समाधान शिबिराला’ भर पावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद; शिबिरात जितेंद्र डुडी यांची मोठी घोषणा, पानंद रस्त्यांसाठी मिळणार निधी

Friday, 31 July 2026, 21:13

४५ लाखांची लाच स्वीकारताना वन अधिकाऱ्याला रंगेहात अटक; बीडच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ

Friday, 31 July 2026, 20:32

मराठी साहित्यासाठी पैशांचा पाऊस! शंभराव्या साहित्य संमेलनासाठी तब्बल १८ कोटी रुपयांच्या भरघोस निधीची घोषणा

Friday, 31 July 2026, 19:39
Next Post

राज्यात पावसाचा जोर कायम; हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी ....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.