Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Supriya Sule: “अजितदादांचे निर्णय त्यांच्यासोबतच गेले!” सुप्रिया सुळेंचं मोठं विधान; पार्थ पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपावरही सोडलं मौन….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 17 February 2026, 15:15
Supriya Sule: "Ajitdada's decisions went with him!" Supriya Sule's big statement; She also broke her silence on the scam allegations against Parth Pawar....

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Supriya Sule) दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत गेल्या (Ajit Pawar Death) काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता विराम (Parth Pawar Land Scam) मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर या चर्चांना वेग आला होता. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात (Maharashtra Politics) विलीनीकरणासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली होती, असा दावा काही नेत्यांकडून केला जात होता. मात्र आता या शक्यतांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Breaking News)

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट भूमिका मांडली. “अजित पवारांनी घेतलेले निर्णय त्यांच्यासोबतच गेले आहेत. आता माझा भाऊ नाही, त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चांना काहीच अर्थ उरत नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर विलीनीकरणाच्या चर्चांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, पुण्यातील गाजलेल्या मुंढवा भूखंड प्रकरणावरूनही सुळे यांनी सावध प्रतिक्रिया दिली. विकास खारगे समितीच्या अहवालात पार्थ पवार यांना दिलासा मिळाल्याची चर्चा आहे. मात्र “महसूल विभागाचा अहवाल अधिकृतपणे प्रसिद्ध झालेला नाही. तो प्रत्यक्ष वाचल्याशिवाय केवळ सूत्रांच्या आधारे भाष्य करणे योग्य ठरणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणावर बोलताना त्यांनी कौटुंबिक संवादाचाही उल्लेख केला. “जेव्हा पार्थचे नाव प्रथम समोर आले, तेव्हा मी स्वतः त्याच्याशी संवाद साधला होता. त्याने मला ‘मी काहीही चुकीचे केलेले नाही’ असे स्पष्ट सांगितले. मी माझ्या पुतण्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला,” असे सुळे म्हणाल्या.

सुळे यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या राजकीय समीकरणांबाबत नवे संकेत मिळत असून, आगामी काळात पक्षाची स्वतंत्र वाटचाल अधिक ठळकपणे दिसण्याची शक्यता आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

Pune News: पुणे शहरात तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन चारित्र्य पडताळणी सेवा तात्पुरती बंद; नागरिकांनी ऑफलाईन सेवेचा लाभ घ्यावा — डीसीपी संदीप भाजीभाकरे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.