Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sonali Andekar: सोनाली आंदेकर विजयी; तुरुंगातून रचला विजयाचा इतिहास, कसब्यात खळबळ, प्रतिभा धंगेकरांना धूळ चारली, पुण्यातील प्रभाग 23 चा निकाल ऐतिहासिक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 16 January 2026, 17:01
Sonali Andekar: Sonali Andekar wins; created history of victory from jail, excitement in the town, Pratibha Dhangekar was defeated, the result of Ward 23 in Pune is historic

पुणे: राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी (15 जानेवारी) पार पडलेल्या (Sonali Andekar) मतदानाचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत अनेक (Ravindra Dhangekar) राजकीय घडामोडी चर्चेत राहिल्या, मात्र पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 चा निकाल सर्वाधिक (Pune Mahapalika Result) लक्षवेधी ठरला. कारण, या प्रभागातून अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने आयुष कोमकर हत्या प्रकरणात (Breaking News) तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना उमेदवारी दिली होती. तुरुंगातून निवडणूक लढवलेल्या या दोघींचा निकाल आज समोर आला असून, सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर दोघी विजयी झाल्या आहेत.
(Latest Marathi News)

 

या प्रभागात राष्ट्रवादीला केवळ एकच जागा मिळाली असून उर्वरित तीन जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे याच प्रभागातून शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकरही निवडणुकीच्या रिंगणात होत्या, मात्र त्यांनाही पराभव स्वीकारावा लागला.

सोनाली आंदेकर या वनराज आंदेकर यांची पत्नी असून आयुष कोमकर हत्या प्रकरणातील त्या आरोपी आहेत. लक्ष्मी आंदेकर यांच्यासह त्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दोघींनाही विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी देत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुभा दिली होती. त्यानुसार त्यांनी 27 डिसेंबर रोजी अर्ज भरला होता. आंदेकर कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेता या उमेदवारीवर राज्यभरातून टीका झाली होती.

अजित पवार यांनी पुणे गुन्हेगारीमुक्त करणार असल्याचा दावा केला असताना, गुन्हेगारी प्रकरणातील आरोपींना उमेदवारी दिल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. भाजप नेत्यांनीही यावर जोरदार हल्लाबोल केला होता.

आजच्या निकालानंतर पुन्हा एकदा पुण्यातील राजकारण आणि गुन्हेगारी यांचं नातं चर्चेत आलं आहे. तुरुंगात असतानाही सोनाली आंदेकर यांचा विजय हा केवळ राजकीय नाही, तर सामाजिक आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही गंभीर प्रश्न निर्माण करणारा निकाल मानला जात आहे. पुणेकरांनी दिलेल्या या कौलातून नेमका काय संदेश दिला आहे, यावर आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

200 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि 12 लाखांची मागणी; नाशिकमध्ये सेक्स स्कँडलचा पर्दाफाश?

Friday, 3 April 2026, 9:39
Ashok Kharat

Ashok Kharat : नाशिकचा ‘भोंदू’ अखेर कोठडीत! मंतरलेलं पाणी, अघोरी कृत्य आणि अत्याचाराचा भयंकर पाढा; 7 दिवसांची पोलीस कोठडी.

Friday, 3 April 2026, 9:32

पुणेकरांच्या खिशाला चटका! CNG च्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार; जाणून घ्या नवे दर

Friday, 3 April 2026, 8:34

पोलीस ठाण्यातच ‘डील’! आरोपीला अटक न करण्यासाठी चक्क 3 लाखांची मागणी; पोलीस निरीक्षकाला लाच घेताना पकडले रंगेहाथ

Friday, 3 April 2026, 8:23

70 कोटींची माया अन् 100 खात्यांचा एकच वारसदार; अशोक खरातच्या बेनामी साम्राज्याचा पर्दाफाश

Friday, 3 April 2026, 8:13

Pune News: खेळता खेळता धावून आला काळ! उघड्या पाण्याच्या टाकीने हिरावले एका कुटुंबाचे सुख; नेमकं काय घडलं? वाचा

Friday, 3 April 2026, 8:07
Next Post
Lakshmi Andekar Win: 'Andekar' pattern in full swing in Kasba! Mother-in-law and daughter-in-law win resoundingly from jail; BJP's Rituja Gadale is left in the dust by a margin of just 81 votes

Lakshmi Andekar Win: कसब्यात 'आंदेकर' पॅटर्न जोरात! सासू-सुनेचा जेलमधून दणदणीत विजय; फक्त 81 मतांच्या फरकाने भाजपच्या ऋतूजा गडाळेंना चारली धूळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.