Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील धक्कादायक प्रकार! ‘ओरडलीस तर अजून मारू” म्हणत उपचारासाठी आलेल्या वृद्ध महिलेला डॉक्टरकडून मारहाण…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 19 June 2026, 20:05

पुणे: पुण्यातील नन्हे परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या 60 वर्षीय महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान वेदना असह्य झाल्याने महिला ओरडल्याचा राग आल्याने डॉक्टरांनी तिच्या कानाखाली मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संबंधित महिला आपल्या सुनेसह भुमकर चौकातील मयुरेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेल्या होत्या. तेथे डॉ. मयुर शंतनुराव यादव शिंदे यांनी त्यांची तपासणी करून प्लास्टर करण्यास सुरुवात केली. मात्र उपचार सुरू असताना वेदना वाढल्यामुळे महिला मोठ्याने ओरडल्या.

तक्रारीनुसार, याच कारणावरून डॉक्टर संतापले आणि त्यांनी महिलेच्या कानाखाली मारले. तसेच “पुन्हा ओरडलीस तर आणखी मारीन” अशी धमकीही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने थेट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मयुर शंतनुराव यादव शिंदे (वय 40, रा. स्वामी अंगण बिल्डिंग, भुमकरनगर, नन्हेगाव, पुणे) यांच्याविरुद्ध तक्रारीची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास सुरू आहे.

दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णाशी अशा प्रकारे वागणे गंभीर आणि निंदनीय असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. अनेकांनी संबंधित डॉक्टरवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याबाबत विचारणा केली असता संबंधित डॉक्टरांनी उपचारादरम्यान रुग्णाला नियंत्रित करण्यासाठी अशा प्रकारची हाताळणी करणे हे प्रशिक्षणाचा भाग असल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र या दाव्यावरही नागरिकांनी आक्षेप घेतला असून हा प्रकार वैद्यकीय नैतिकतेला काळिमा फासणारा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा आणि डॉक्टर-रुग्ण नात्यातील विश्वासाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

इंदापुरात अनैतिक संबंधांच्या संशयातून 54 वर्षीय व्यक्तीचा लोखंडी रॉडने ठेचून निर्घृण खून; मुख्य आरोपी तात्काळ जेरबंद

Sunday, 21 June 2026, 12:59

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी पोलिस निरीक्षक नंदकुमार कोळी यांची नियुक्ती

Sunday, 21 June 2026, 12:48

कुरकुंभच्या ‘हार्मनी ऑर्गेनिक्स’ला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका; 48 तासांत वीज-पाणी तोडण्याचे आदेश

Sunday, 21 June 2026, 12:38

येरवडा मनोरुग्णालयात फक्त एका ‘चादरीवरून’ वाद झाला अन् घडलं भयंकर…

Sunday, 21 June 2026, 12:32

पुण्यात ‘मी इथला भाई’, म्हणत नागरिकांना धमकावणाऱ्या गुंडाचा राडा; पाहा व्हायरल व्हिडीओ

Sunday, 21 June 2026, 11:49

भुलेश्वर घाटात ‘देवदर्शना’च्या बहाण्याने नेऊन तरुणाला बेदम मारहाण; तरुणीसह 3 अनोळखी इसमांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 21 June 2026, 11:13
Next Post

'माझा तस्करीचा माल सोड, नाहीतर तुझ्या कुटुंबाला.." पुण्यातील DRI अधिकाऱ्यांना डायरेक्ट 'दाऊद'च्या नावाने धमकी; नेमकं प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.