पुणे: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Rohit Pawar) यांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्तरावर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन (Ajit Pawar Death) ब्युरोने दिलेल्या निवेदनानुसार, अपघातग्रस्त विमानातील दोन्ही रेकॉर्डर भीषण आगीत (Sunetra Pawar) बराच वेळ राहिल्यामुळे उच्च तापमानाचा (Parth Pawar) परिणाम सहन करावा लागला. तरीही L3 संभाषणाशी संबंधित काही डेटा यशस्वीरित्या मिळवण्यात तपास यंत्रणेला यश आले आहे. (Maharashtra Politics)

सदर विमानात फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर असे दोन स्वतंत्र रेकॉर्डिंग यंत्र होते. आगीमुळे त्यांचे बाह्य भाग आणि काही अंतर्गत घटक बाधित झाले असले तरी तांत्रिक पातळीवर डेटा पुनर्प्राप्तीची प्रक्रिया सुरू आहे. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरचा सखोल तपास सुरू असून संबंधित उपकरण तयार करणाऱ्या कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधींची मदत मागवण्यात आली आहे. तसेच विमानाची निर्मिती ज्या देशात झाली, त्या देशातील अधिकृत संस्थांशीही संपर्क साधण्यात आल्याचे एएआयबीने स्पष्ट केले आहे. तपास आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सुरू असून कोणतेही तर्कवितर्क न लावता अधिकृत निष्कर्षाची प्रतीक्षा करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, गृहमंत्री आणि नागरी उड्डाण मंत्र्यांशी संपर्क साधून उपलब्ध पुरावे सादर केले आहेत. तपास निष्पक्ष व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून वेळ मिळाला नसल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
अपघातानंतर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. मात्र पुढील काळात राजकीय भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या जात असल्याचे त्यांनी सूचित केले. तपास पुढे सरकत असताना या प्रकरणातील तांत्रिक निष्कर्ष आणि राजकीय प्रतिक्रिया याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.







