Thursday, November 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महालक्ष्मी एक्स्प्रेसवरील दरोड्यानंतर रेल्वे सुरक्षा कडक; पुणे विभागातील २० मेल-एक्स्प्रेस गाड्यांना आरपीएफ एस्कॉर्ट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 5 November 2026, 17:11

पुणे : महालक्ष्मी एक्स्प्रेसवरील दरोड्याच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक केल्या आहेत. रेल्वे मार्गालगत रात्रीची गस्त वाढविण्यात आली असून, विशेषतः सिग्नल यंत्रणा असलेल्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षा अधिक प्रभावी करण्यात आली आहे. पुणे विभागातून धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नियमित सुरक्षा एस्कॉर्ट तैनात करण्यात येत आहे.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून दररोज २०० हून अधिक रेल्वे गाड्या धावतात. यापैकी सुमारे ६५ ते ७० गाड्या पुण्यातून सुटतात, तर अनेक महत्त्वाच्या एक्स्प्रेस पुणे मार्गावरून धावतात.

रात्रीच्या वेळी धावणाऱ्या २० मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आरपीएफकडून नियमित सुरक्षा एस्कॉर्ट पुरविले जाते. साधारणपणे एका अधिकाऱ्यासह तीन जवानांचे पथक गाडीत तैनात असते. प्रवासादरम्यान चोरी, महिलांची छेडछाड आणि अन्य गुन्हेगारी प्रकार रोखण्यासह प्रवाशांच्या सुरक्षिततेवर हे जवान लक्ष ठेवतात.

गुन्हेगारी घटनांचे प्रमाण आणि संवेदनशील रेल्वे मार्गांचा आढावा घेऊन अन्य गाड्यांमध्येही अचानक सुरक्षा पथके तैनात केली जातात.

पुणे-लोणावळा लोकलमधून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या वेळेत महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला डब्यांमध्ये विशेष महिला आरपीएफ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या कर्मचाऱ्यांकडून विशेष लक्ष ठेवले जाते.

महालक्ष्मी एक्स्प्रेस सातारा परिसरातून जात असताना दरोडेखोरांनी सिग्नल यंत्रणेत बिघाड करून रेल्वे थांबवली. त्यानंतर गाडीवर दगडफेक करत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडीत तैनात असलेल्या तीन आरपीएफ जवानांनी प्रसंगावधान राखत डब्यांचे दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न केला आणि दरोडेखोरांना प्रतिकार केला.

जवानांच्या तत्परतेमुळे दरोड्याचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होऊ शकला नाही. या घटनेनंतर पाच ते सहा दरोडेखोर घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणाचा तपास आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांकडून सुरू आहे.

या घटनेनंतर रात्रीच्या वेळी रेल्वे मार्गालगत गस्त वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः सिग्नल यंत्रणा असलेल्या ठिकाणांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

पुणे विभागासाठी आरपीएफचे ४५८ अधिकारी आणि जवानांचे मनुष्यबळ उपलब्ध असून, त्यांच्यामार्फत गस्तीचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले कार्यक्षेत्र सोडून अन्यत्र जाऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे प्रवास सुरक्षित करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शिरूर भूमी अभिलेख कार्यालयाचे कारनामे! शासकीय इमारतीसाठी नैसर्गिक ओढाच बुजवला?

Thursday, 5 November 2026, 18:24

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! बोनसची घोषणा, परिवहन मंत्र्यांनी दिली मोठी भेट

Thursday, 5 November 2026, 18:23

पत्नीला माहेरी ठेवल्याचा राग; जावयाने सासऱ्याची रिक्षा पेटवली, हडपसरमध्ये सराईत गुन्हेगाराला अटक

Thursday, 5 November 2026, 18:19

फुटबॉलच्या ‘किंग’चा आंतरराष्ट्रीय मैदानाला अलविदा! रोनाल्डोच्या निवृत्तीने जगभरातील चाहत्यांना अश्रू अनावर

Thursday, 5 November 2026, 18:06

पुण्यातील ‘प्लंज’ पबमध्ये पहाटे ४ वाजेपर्यंत धिंगाणा; मालकासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 5 November 2026, 17:57

वंदे भारत स्लीपरची क्रेझ! मुंबई-बेंगळुरू ट्रेन फुल्ल, तिकीटासाठी किती दिवसांचं वेटिंग?

Thursday, 5 November 2026, 17:16
Next Post

वंदे भारत स्लीपरची क्रेझ! मुंबई-बेंगळुरू ट्रेन फुल्ल, तिकीटासाठी किती दिवसांचं वेटिंग?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp