Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील ‘प्लंज’ पबमध्ये पहाटे ४ वाजेपर्यंत धिंगाणा; मालकासह ६ जणांवर गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 5 November 2026, 17:57

पुणे : शहरातील कोरेगाव पार्क परिसरातील ‘प्लंज’ पबमध्ये नियमांचे उल्लंघन करून पहाटे ४ वाजेपर्यंत मद्यविक्री सुरू ठेवल्याचा आणि मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर लावून नागरिकांना त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पबच्या मालकासह सहा जणांविरोधात कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जितेश मेहता (पबचे मालक), सुनील पवार (व्यवस्थापक), विराज, शुभम आचारी, राहुलसिंग, तसेच डीजे ओंकार आणि डीजे श्रेयश यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क येथील ज्वेलर टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावर ‘प्लंज’ पब आणि बार आहे. नियमानुसार या ठिकाणी मध्यरात्री दीड वाजेपर्यंत मद्यविक्रीची परवानगी आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करून पबमध्ये पहाटे ४ वाजेपर्यंत मद्यविक्री सुरू होती. त्याचबरोबर मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर लावून धिंगाणा सुरू होता.

१ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत हा प्रकार सुरू असल्याने परिसरातील नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून तक्रार केली. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पबमध्ये लाऊड स्पीकर सुरू असल्याचे आणि काही जण मद्यपान करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून लाऊड स्पीकर तसेच काऊंटरवरील बिलिंग विभागातील साहित्य जप्त केले आहे. पबच्या मालकासह संबंधित सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोलापुरात कार-कंटेनरचा भीषण अपघात; ८ वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Friday, 6 November 2026, 19:26

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण; मुलाची स्वतंत्र तपास यंत्रणेकडे चौकशी सोपवण्याची मागणी, हायकोर्टाने तातडीची सुनावणी नाकारली

Friday, 6 November 2026, 18:37

दिवाळीची मोठी भेट! फडणवीस सरकारचा 9 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टीचा निर्णय; 7 ते 11 नोव्हेंबरपर्यंत सलग 5 दिवस सुट्या, काय बंद राहणार?

Friday, 6 November 2026, 18:32

पुणे मेट्रोला पहिल्याच दिवशी ५० हजार प्रवाशांचा प्रतिसाद! जिल्हा न्यायालय स्थानकावर सर्वाधिक गर्दी

Friday, 6 November 2026, 17:55

प्रेमप्रकरणातून रक्तरंजित थरार! नवी मुंबईत दोन सख्ख्या बहिणींवर गोळीबार; एकीच्या पाठीत, तर दुसरीही जखमी!

Friday, 6 November 2026, 17:42

पुण्यातील दोन अल्पवयीन मुलांकडून गावठी पिस्तूल आणि काडतूस जप्त; बिबवेवाडी पोलिसांची कारवाई

Friday, 6 November 2026, 17:17
Next Post

फुटबॉलच्या ‘किंग’चा आंतरराष्ट्रीय मैदानाला अलविदा! रोनाल्डोच्या निवृत्तीने जगभरातील चाहत्यांना अश्रू अनावर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp