Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण; मुलाची स्वतंत्र तपास यंत्रणेकडे चौकशी सोपवण्याची मागणी, हायकोर्टाने तातडीची सुनावणी नाकारली

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 6 November 2026, 18:37

ठाणे : मानपाडा परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे व्हावा, यासाठी प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तपास स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावा, तसेच राजेंद्र शिंदे यांचा जबाब तपासाच्या रेकॉर्डवर घ्यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

मात्र, या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी उच्च न्यायालयाने नाकारली आहे. तपासातील आतापर्यंतची प्रगती लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय घेतला. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर नियमित खंडपीठासमोर याचिका सादर करण्याची मुभा याचिकाकर्त्यांना देण्यात आली आहे.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास सध्या विशेष तपास पथकाकडून (SIT) सुरू आहे. मात्र, या तपासावर राम पूर्णेकर आणि तक्रारदार मंदार घोडके यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. हल्ल्याच्या वेळी मारेकऱ्यांनी परिधान केलेले कपडे जप्त करण्यात एसआयटीला अपयश आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास अधिक निष्पक्षपणे व्हावा, यासाठी तो स्वतंत्र तपास यंत्रणेकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच राजेंद्र शिंदे यांचा जबाब तपासाच्या रेकॉर्डवर घेण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

शुक्रवारी न्यायमूर्ती अद्वैत सेठना आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षाने तपासाची माहिती न्यायालयासमोर मांडली.

२९ सप्टेंबर रोजी प्रदीप पूर्णेकर यांची हत्या झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच दिवशी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आणि पहिली अटकही करण्यात आली, अशी माहिती सरकारी पक्षाने दिली. तसेच, अवघ्या दहा दिवसांत पाच आरोपींना अटक करण्यात आल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले.

सरकारी पक्षाने सादर केलेल्या तपासाच्या प्रगतीची न्यायालयाने दखल घेतली. तपास यंत्रणा जे काम करत आहे, त्याची प्रशंसा झाली पाहिजे, अशी टिप्पणी न्यायालयाने सुनावणीदरम्यान केली.

दरम्यान, तातडीच्या सुनावणीची मागणी फेटाळण्यात आली असली, तरी दिवाळीच्या सुट्टीनंतर नियमित खंडपीठासमोर याचिका मांडण्याचा मार्ग याचिकाकर्त्यांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील न्यायालयीन घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोलापुरात कार-कंटेनरचा भीषण अपघात; ८ वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Friday, 6 November 2026, 19:26

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण; मुलाची स्वतंत्र तपास यंत्रणेकडे चौकशी सोपवण्याची मागणी, हायकोर्टाने तातडीची सुनावणी नाकारली

Friday, 6 November 2026, 18:37

दिवाळीची मोठी भेट! फडणवीस सरकारचा 9 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टीचा निर्णय; 7 ते 11 नोव्हेंबरपर्यंत सलग 5 दिवस सुट्या, काय बंद राहणार?

Friday, 6 November 2026, 18:32

पुणे मेट्रोला पहिल्याच दिवशी ५० हजार प्रवाशांचा प्रतिसाद! जिल्हा न्यायालय स्थानकावर सर्वाधिक गर्दी

Friday, 6 November 2026, 17:55

प्रेमप्रकरणातून रक्तरंजित थरार! नवी मुंबईत दोन सख्ख्या बहिणींवर गोळीबार; एकीच्या पाठीत, तर दुसरीही जखमी!

Friday, 6 November 2026, 17:42

पुण्यातील दोन अल्पवयीन मुलांकडून गावठी पिस्तूल आणि काडतूस जप्त; बिबवेवाडी पोलिसांची कारवाई

Friday, 6 November 2026, 17:17
Next Post

सोलापुरात कार-कंटेनरचा भीषण अपघात; ८ वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp