Friday, May 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Water Cut: पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! 948 कोटींच्या थकबाकीसाठी मंगळवारपासून पाणीपुरवठा तोडण्याचा इशारा…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 14 March 2026, 14:59
Pune Water Cut: Punekars, use water wisely! Warning of water supply cut from Tuesday for arrears of Rs 948 crore...

पुणे: भर उन्हाळा सुरू होण्याच्या तोंडावर पुणे शहरावर (Pune Water Cut) पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खडकवासला धरण प्रकल्पाची तब्बल 948 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत असल्याने जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला कडक इशारा दिला आहे. येत्या 23 मार्चपर्यंत थकीत रक्कम जमा न केल्यास 24 मार्चपासून पुण्याचा पाणीपुरवठा थांबवण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आल्याने महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

या वादाचे मूळ कारण पाणी वापराच्या प्रमाणाशी संबंधित आहे. जलसंपदा विभागाच्या म्हणण्यानुसार, पुणे शहरासाठी खडकवासला प्रकल्पातून दरवर्षी 11.60 टीएमसी पाणी वापरण्याची परवानगी आहे. मात्र प्रत्यक्षात महापालिका दरवर्षी सुमारे 8 ते 9 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अतिरिक्त पाण्यासाठी दंडासह दरवर्षी सुमारे 300 कोटी रुपये भरावे लागतात. मात्र चालू आर्थिक वर्षात महापालिकेने केवळ 97 कोटी रुपये भरल्यामुळे थकबाकीची रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे सांगितले जात आहे.

 

दरम्यान, या मुद्द्यावर महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेचेच सुमारे 411 कोटी रुपये जलसंपदा विभागाकडे अतिरिक्त जमा असल्याचा दावा केला आहे. मात्र जलसंपदा विभागाने हा दावा फेटाळून लावत आधी थकीत रक्कम भरण्याची मागणी केली आहे.

याशिवाय शहरातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचाही मुद्दा पुढे आला आहे. दरवर्षी सुमारे 13 टीएमसी सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते नदीपात्रात सोडले जात असल्याचा आरोप जलसंपदा विभागाने केला आहे. त्यामुळे महापालिकेवर अतिरिक्त दंडही आकारला जात आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत महापालिकेने 1.24 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरल्याचेही समोर आले आहे.

दोन्ही विभागांतील हा वाद लवकर सुटला नाही तर उन्हाळ्याच्या तोंडावर पुणेकरांना पाणीटंचाईचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या प्रश्नावर तोडगा निघतो का, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

चारित्र्यावर संशय, अन् थेट जीवे मारण्याचा प्रयत्न! महिला पोलीस अधिकाऱ्यावर पतीने केला प्राणघातक हल्ला.

Friday, 29 May 2026, 20:56

Big Breaking: लोणी काळभोर अपर तहसील कार्यालयातील तलाठ्यावर 2 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Friday, 29 May 2026, 20:19

“जमीन कशी घेता, आम्ही पाहतो!” म्हणत जमिनीच्या वादातून सोलापूर सीमेवर 6 जणांची गोळ्या झाडून हत्या

Friday, 29 May 2026, 20:00

जनगणना करायला गेलेल्या पालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला जबर मारहाण; पुण्यातील घटना

Friday, 29 May 2026, 18:55

रुग्णांच्या जीवाशी खेळ? नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत गंभीर त्रुटी; आमदारांकडून कामाची पाहणी

Friday, 29 May 2026, 18:36

हार्दिक पांड्या टीममधून बाहेर? मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण

Friday, 29 May 2026, 18:26
Next Post

सोनं खरेदी करायची हीच योग्य वेळ! युद्धानंतर दरात काहीशी घट; जाणून घ्या नावे दर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.