Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रुग्णांच्या जीवाशी खेळ? नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत गंभीर त्रुटी; आमदारांकडून कामाची पाहणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 29 May 2026, 18:36

प्रतिनिधी विशाल शिंदे

भोर: भोर तालुक्यातील नसरापूर येथे उभारण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीतील गंभीर त्रुटींची आता आमदार पातळीवर दखल घेण्यात आली आहे. आरोग्य विभागाने यापूर्वीच लेखी स्वरूपात अनेक त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची दखल घेत आमदार शंकर मांडेकर यांनी आज आरोग्य केंद्राला प्रत्यक्ष भेट देत संपूर्ण कामाची पाहणी केली.

नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असताना अनेक गंभीर त्रुटी समोर आल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागाने दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजीच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवून इमारतीमध्ये अत्यावश्यक फेरदुरुस्ती करण्याची मागणी केली होती.

या पत्रामध्ये मुख्य इमारतीत स्वतंत्र EXIT Door नसणे, प्रसूतीगृहालगत शौचालयाची सुविधा नसणे, औषध वितरण विभागातील खिडकी अयोग्य असणे, मेडिकल स्टोअरची अपुरी जागा, मीटिंग हॉलचे कमी क्षेत्रफळ तसेच बायोमेडिकल कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र BMW Store नसणे अशा गंभीर मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला होता.

 

दरम्यान, या संदर्भातील बातम्या प्रसारित झाल्यानंतर आमदार यांनी आज नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी इमारतीतील विविध विभाग, प्रसूतीगृह, औषध वितरण विभाग, रुग्ण कक्ष तसेच छतावरील कामाची पाहणी केली.

पाहणीदरम्यान काही भिंतींना तडे गेल्याचे निदर्शनास आले. तसेच काही बांधकाम चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचेही समोर आले. प्रसूती विभागात आवश्यक त्या ठिकाणी बाथरूमची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे भविष्यात महिला रुग्णांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

याशिवाय इमारतीवर बसवण्यात आलेले पत्रे योग्य पद्धतीने बसवले नसल्याने पावसाळ्यात पाणी इमारतीमध्ये येण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

यावेळी आमदार यांनी संबंधित अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी चर्चा करत सर्व त्रुटी तातडीने दूर करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित आरोग्य सुविधा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून कोणत्याही प्रकारचे निकृष्ट काम खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

यानंतर आमदार मांडेकर यांनी नसरापूर येथील कातकरी वस्तीलाही भेट दिली. या ठिकाणी मंजूर झालेल्या घरकुलांची कामे अद्याप सुरू नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित विभागाशी चर्चा करून पुढील पंधरा दिवसांत घरकुलांच्या कामाला सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी प्रशासक सरपंच , ग्रामसेवक , ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

“नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्र हे संपूर्ण परिसरासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे बांधकामामध्ये कोणतीही त्रुटी राहता कामा नये. आज पाहणीदरम्यान काही गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”

– आमदार शंकर मांडेकर

 

आरोग्य विभागाने आधीच त्रुटी दाखवून दिल्या… स्थानिकांनीही आवाज उठवला… आणि आता आमदारांनी स्वतः पाहणी करत प्रशासनाला धारेवर धरले… त्यामुळे नसरापूरच्या नव्या आरोग्य केंद्रातील कामे आता कितपत सुधारली जातात… हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे…

प्रतिनिधी विशाल शिंदे… नसरापूर.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात गणपती विसर्जनाची गडबड अन् शनिवार पेठेत खळबळ! घराला कुलूप पाहून डाव टाकला अन् ३० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Monday, 28 September 2026, 14:31

आज सोने खरेदी करणं योग्य की थांबावं? दर आणि बाजारातील संकेत जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 14:30

‘लाडक्या बहिणीं’ची एसटी सवलत धोक्यात! NCMC कार्ड नसल्यास 1 ऑक्टोबरपासून मिळणार नाही सवलत

Monday, 28 September 2026, 14:06

दुष्काळाची झळ आता शेअर बाजारालाही? महाराष्ट्रातील परिस्थितीने वाढवली चिंता

Monday, 28 September 2026, 13:55

‘तुरुंगात जायची तयारी आहे, पण शरण जाणार नाही!’ मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Monday, 28 September 2026, 13:06

दौंडमध्ये पैशांसाठी तरुणाला लोखंडी गजाने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 12:32
Next Post

जनगणना करायला गेलेल्या पालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला जबर मारहाण; पुण्यातील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp