पुणे: पुणे महापालिका निवडणुकीत दिग्गज (Pune Vote Scam) नेत्यांना धक्का बसलेला असतानाच ठाकरे गटाचे शहरातील नेते वसंत मोरे आणि त्यांच्या मुलाचा (Vasant More) पराभवही चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र हा (Pune Election) पराभव स्वीकारताना वसंत मोरे यांनी थेट निवडणूक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. मतदानाच्या (Pune Politics) दिवशी जाहीर करण्यात आलेली आकडेवारी आणि प्रत्यक्ष मतमोजणीतील आकडे यामध्ये मोठा फरक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Latest Marathi News)

प्रभाग क्रमांक 38 मध्ये मतदानाच्या दिवशी रात्री 10 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी करमरकर यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एकूण 79 हजार 826 मतदारांनी मतदान केल्याची आकडेवारी दिली होती. मात्र मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्षात फक्त 78 हजार 718 मतेच मोजण्यात आली. म्हणजेच तब्बल 1,108 मते कमी कशी झाली, असा थेट सवाल वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे.

या आकडेवारीतील गोंधळ आणखी संशयास्पद ठरतो कारण याच अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 36 आणि 37 मध्ये मात्र आधी जाहीर झालेल्या आकडेवारीपेक्षा मतमोजणीवेळी मतदान वाढलेले दिसून आले. मग फक्त प्रभाग 38 मध्येच मतदान 1,108 ने कमी कसे झाले? आणि विशेष म्हणजे याच प्रभागात मला अवघ्या 1,011 मतांनी पराभव स्वीकारावा लागला, हे केवळ योगायोग आहे का, असा सवालही मोरे यांनी उपस्थित केला आहे.
वसंत मोरे यांनी फेसबुकवर निवडणूक निकालाची अधिकृत आकडेवारीची प्रत शेअर करत ही बाब सार्वजनिक केली आहे. “जनतेचा कौल आम्ही मान्य करतो, मात्र काही ठिकाणी अधिकाऱ्यांनीच निवडणूक जिंकून दिल्याची भावना निर्माण होत आहे,” अशी थेट टीका त्यांनी केली आहे.







