Wednesday, June 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे हादरले! किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात मारला गॅस सिलेंडर; खराडीत पत्नीचा जागीच मृत्यू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 June 2026, 14:28

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात पती-पत्नीतील किरकोळ वादाचे रूप थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतापाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात छोटा गॅस सिलेंडर मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.

मृत महिलेचे नाव किरण बाबर असून तिचे वय अंदाजे 30 ते 32 वर्षे असल्याची माहिती आहे. तर जयराम बाबर असे आरोपी पतीचे नाव आहे. दोघेही मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी असून रोजगाराच्या निमित्ताने पुण्यात वास्तव्यास होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य खराडीतील एका लेबर कॅम्पमध्ये राहत होते. दोघेही कचरा संकलनाच्या वाहनावर काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी मध्यरात्री त्यांच्या घरात किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र काही वेळातच हा वाद विकोपाला गेला.

 

रागाच्या भरात जयराम बाबर याने घरात असलेला छोटा गॅस सिलेंडर उचलून पत्नीच्या डोक्यात जोरात मारला. या हल्ल्यात किरणच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच खराडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासानंतर आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

घटनेनंतर आरोपी जयराम बाबर फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. या घटनेमुळे खराडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या दुर्दैवी घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी कायद्यात बदल; आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी

Wednesday, 24 June 2026, 15:38

सुरक्षारक्षकाला थाप मारली अन् गडावरून तसाच निसटला सियाचा बॉयफ्रेंड; तिकीट काउंटरवर नेमकं काय घडलं?

Wednesday, 24 June 2026, 15:03

केतनला संपवण्यासाठी कॅफेत रचला होता ‘फुलप्रूफ’ कट; हत्येचा A टू Z मास्टरप्लॅन आला समोर

Wednesday, 24 June 2026, 14:52

पुण्याचा ‘माझे अस्तित्व’ उपक्रम ठरला आदर्श; राज्यातील एकल महिलांसाठी आता विशेष तरतूद

Wednesday, 24 June 2026, 14:33

पुणे हादरले! किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात मारला गॅस सिलेंडर; खराडीत पत्नीचा जागीच मृत्यू

Wednesday, 24 June 2026, 14:28

रांजणगाव गणपती परिसरात अपघातांचे सत्र सुरूच; ट्रक पलटी होऊन चार गावांचा वीजपुरवठा खंडित

Wednesday, 24 June 2026, 14:15
Next Post

पुण्याचा 'माझे अस्तित्व' उपक्रम ठरला आदर्श; राज्यातील एकल महिलांसाठी आता विशेष तरतूद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.