पुणे: पुणे शहरात शिवसेनेच्या तिकीट (Pune Politics) वाटपावरून मोठा असंतोष निर्माण (Neelam Gorhe) झाला आहे. शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर आणि (Shivsena) पदाधिकाऱ्यांवर अन्याय होत असून (Eknath Shinde) तिकीट वाटप कमर्शिअल पद्धतीने होत असल्याचा गंभीर आरोप एकनाथ शिंदे गटातील (Pune Mahapalika Election) शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी काही पदाधिकाऱ्यांनी पुण्यात नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन केले. (Latest Marathi News)

आंदोलकांचा सवाल
पुणे महापालिका निवडणुकीसाठी युतीतील जागा वाटपावरून शिवसेनेत प्रचंड धुसफूस सुरू आहे. भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेला केवळ 15 जागा देण्याची तयारी असल्याची माहिती समोर आल्यानंतर इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी संतप्त झाले. तुम्ही कोणत्या आधारावर 15 जागांवर समाधान मानले, असा सवाल आंदोलकांनी नीलम गोऱ्हे यांना केला.

इतर पर्यायांचाही विचार
या आंदोलनानंतर नीलम गोऱ्हे यांनी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली. शिवसेना कार्यकर्त्यांना चुकीची माहिती मिळाली होती. आपण फक्त 15 जागांची मागणी केली असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात शिवसेनेने भाजपकडे 25 पेक्षा अधिक जागांची मागणी केली आहे, असे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. अपेक्षित जागा न मिळाल्यास इतर पर्यायांचाही विचार केला जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. तसेच पक्षाच्या वरिष्ठांकडून स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा आदेश आला, तर तो निर्णयही घेतला जाईल, असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना कळवले.

तिकीट वाटपाचे आरोप
तिकीट वाटपाचा निर्णय कोणत्याही एका व्यक्तीचा नसून पुणे शहरातील कोअर कमिटी एकत्रितपणे हा निर्णय घेते. कोअर कमिटीतील नेत्यांच्या शिफारशीनुसारच उमेदवारी निश्चित होते, असे सांगत कमर्शिअल तिकीट वाटपाचे आरोप नीलम गोऱ्हे यांनी फेटाळले.
दरम्यान, शिवसेना नेते रविंद्र धंगेकर, आबा बागूल आणि अजय भोसले हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत. शिवसेनेकडून 25 जागांची मागणी करण्यात आली असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.







