पुणे: सरत्या वर्षाला निरोप देऊन (Pune New Year Celebration) नववर्षाचे स्वागत करण्यासाठी (31st In Pune) पुणेकरांसाठी दिलासादायक (Pune News) बातमी आहे. पुण्यातील पब, बार आणि रेस्टॉरंटना पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू (Pune Party Place) ठेवण्याची परवानगी पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच दारूची दुकानेही रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्सवाचे वातावरण दिसून येणार आहे.

अधिकृत परवाना आवश्यक
मात्र राज्यात सध्या आचारसंहिता लागू असल्याने मद्यपान (Pune Clubs) करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. नाताळ किंवा 31 डिसेंबरच्या पार्टीपूर्वी दारू पिण्याचा अधिकृत (31st Night) परवाना काढणे आवश्यक असणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात मोहीम
पुणे, मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे राज्यात आचारसंहिता लागू असून पोलिस आणि भरारी पथकांकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. या काळात ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जाणार आहे.
पोलीस बंदोबस्त तैनात
नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी गैरप्रकार घडू नयेत यासाठी अतिरिक्त पोलीस पथके तैनात राहणार आहेत. आचारसंहितेच्या काळात मद्यविक्री, वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.
पुणेकरांची 31st ची पार्टी जोरात
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या आदेशानुसार 24, 25 आणि 31 डिसेंबर या तीन दिवशी पुण्यातील बार, पब आणि क्लब पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहतील. तर विदेशी मद्य विक्रीची दुकाने रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पुणेकरांची 31st ची पार्टी जोरात होणार असली तरी नियमांचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे.







