Pune Crime: उरुळी कांचन, ता. 01 : दुकानापुढे गोंधळ घालत बसत जावू नये असे म्हटल्याच्या कारणावरून चाकूने हल्ला झालेले उरुळी कांचन येथील प्रभाकर नारायण तुपे यांचा उपचारादरम्यान रविवारी (ता. 30) मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा- अनगर नगरपरिषद निवडणूक स्थगित,जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जाहीर, नेमकं काय कारण?
मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन गावचे हद्दीत तुपेवस्ती परिसरात मंगळवारी (ता. 25) प्रिन्स जनरल स्टोअर्स चे समोर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी आरोपी स्वप्निल बाळु ओव्होळ रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन (ता. हवेली) याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची परिसरात धिंड काढली होती.
प्रभाकर तुपे यांनी तुम्ही दुकानापुढे गोंधळ घालत बसत जावू नका, असे म्हणाले आणि याच कारणावरून आरोपी स्वप्निल ओव्होळ याने शिवीगाळ दमदाटी करून जिवे ठार मारण्याचे उद्देषाने तुपे यांच्यावर धारदार चाकूने पोटात तसेच हातावर वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे रविवारी (ता. 30) निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.






