Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: औषध वितरकांना कोट्यवधींचा चुना; पुण्याच्या महिलेचा मास्टरमाइंड प्लॅन उघड!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 17 January 2026, 9:45

Pune Crime: पुणे : पुणे शहरातील सदाशिव पेठ परिसरात एका नामांकित औषध वितरकाची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तब्बल 3 कोटी 54 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक (Fraud) झाल्याची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे शहरातील औषध व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

सदाशिव पेठेतील सिनिअर एजन्सीचे मालक दिनेश कर्नावट हे औषध वितरणाचा व्यवसाय करतात. आरोपी सोनाली लक्ष्मण गिरीगोसावी हिने सुरुवातीला त्यांच्या एजन्सीकडून रोखीने औषधे खरेदी केली. वेळेवर पैसे दिल्यामुळे तिने कर्नावट यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिने जयेश वसंत जैन याला उधारीवर औषधे देण्याची विनंती केली आणि त्याचे पैसे आपण देणार असल्याचे सांगितले.

या विश्वासावर 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत आरोपींनी टप्प्याटप्प्याने मोठ्या प्रमाणात औषधे उचलली. एकूण 3 कोटी 54 लाख 55 हजार 329 रुपयांचा माल घेतल्यानंतरही त्याचे पैसे देण्यात आले नाहीत. वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कर्नावट यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या दोघांविरुद्ध पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत चार गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व प्रकरणांमधील फसवणुकीची रक्कम 18 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यायालयाने या दोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले असले तरी आरोपी अद्याप फरार आहेत.

या प्रकरणाचा तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जानराव करत आहेत. औषध व्यवसायात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने वितरकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

200 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि 12 लाखांची मागणी; नाशिकमध्ये सेक्स स्कँडलचा पर्दाफाश?

Friday, 3 April 2026, 9:39
Ashok Kharat

Ashok Kharat : नाशिकचा ‘भोंदू’ अखेर कोठडीत! मंतरलेलं पाणी, अघोरी कृत्य आणि अत्याचाराचा भयंकर पाढा; 7 दिवसांची पोलीस कोठडी.

Friday, 3 April 2026, 9:32

पुणेकरांच्या खिशाला चटका! CNG च्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार; जाणून घ्या नवे दर

Friday, 3 April 2026, 8:34

पोलीस ठाण्यातच ‘डील’! आरोपीला अटक न करण्यासाठी चक्क 3 लाखांची मागणी; पोलीस निरीक्षकाला लाच घेताना पकडले रंगेहाथ

Friday, 3 April 2026, 8:23

70 कोटींची माया अन् 100 खात्यांचा एकच वारसदार; अशोक खरातच्या बेनामी साम्राज्याचा पर्दाफाश

Friday, 3 April 2026, 8:13

Pune News: खेळता खेळता धावून आला काळ! उघड्या पाण्याच्या टाकीने हिरावले एका कुटुंबाचे सुख; नेमकं काय घडलं? वाचा

Friday, 3 April 2026, 8:07
Next Post

Pune Election Results : महिलांनी घेतला सत्ता चॅम्पियनचा मुकुट; पुणे महापालिकेत विजयी 67 महिला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.