अमित मुंडीक

पुणे: सिंहगड रोड पोलीस स्टेशन, यांनी धारदार (Pune Crime) लोखंडी हत्याराने दोन इसमांवर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या तसेच कारच्या काचा फोडून दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांना अटक केली आहे. दि. ०४/०२/२०२६ रोजी महालक्ष्मी मंदिरासमोर, पीएमसी शाळेजवळ, वडगाव बुग्रा येथे ५ ते ६ इसमांनी सुझुकी फ्रॉन्क्स कारची तोडफोड करून कारमधील दोघांवर हल्ला केला होता.
या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४७/२०२६ दाखल करून तपास सुरू करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी अमन अंबीर झारेकरी (२२), निशांत राजेश राऊत (२४), सुमित अनिल माने (२२) व स्वप्निल चंद्रकांत गायकवाड (२०) यांना अटक करण्यात आली असून एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले एक दुचाकी वाहन व तीन धारदार लोखंडी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भुपेश साळुंके करीत असून ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.







