Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri Cyber Fraud: धक्कादायक! फक्त ‘पासवर्ड’ बदलला आणि बँक खातं झालं रिकामं; चिंचवडमधील तरुणासोबत घडला थरार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 26 January 2026, 10:27
Pune Cyber ​​Fraud: Senior woman defrauded of Rs 97 lakh by cyber thieves in Karvenagar

Photo-Social Media

Pimpri Cyber Fraud: पुणे : पुणे परिसरात सायबर फसवणुकीचे प्रकार सातत्याने वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अधिक नफा,नोकरी, बक्षीस किंवा तांत्रिक कारणे सांगून लोकांची आर्थिक फसवणूक (Online Fraud Case) केली जात असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे अनेक जण सुरक्षिततेसाठी बँक अ‍ॅप्स आणि ऑनलाइन व्यवहारांचे पासवर्ड वेळोवेळी बदलत असतात. मात्र, याच प्रक्रियेचा गैरफायदा घेत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड परिसरात उघडकीस आला आहे.

देहूगाव येथील अभिलाषा पार्क परिसरात राहणाऱ्या एका तरुणाची पासवर्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने 6 लाख 9 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 7 डिसेंबर 2025 रोजी घडली असून या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम रावसाहेब गीते  (वय 32) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. ते सध्या देहूगाव येथे राहत असून त्यांचे मूळ गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आहे.

फिर्यादी त्यांच्या मोबाइलवर बँक ऑफ महाराष्ट्रचे महा मोबाईल प्लस अ‍ॅप वापरत असताना पासवर्ड अपडेट करण्याची सूचना आली. ही सूचना अधिकृत असल्याचा समज करून त्यांनी नवीन पासवर्ड टाकला. त्यानंतर अचानक अ‍ॅप लॉगआऊट झाले. काही वेळातच त्यांच्या मोबाइलवर बँक व्यवहारांबाबतचे अनेक मेसेज येऊ लागले.

खात्याची तपासणी केल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्यांच्या खात्यातून 4 लाख 85 हजार रुपये, 50 हजार रुपये आणि 39 हजार रुपये अशा वेगवेगळ्या रकमा इतर अनोळखी खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्या होत्या. याशिवाय एटीएम स्वॅप पद्धतीने 35 हजार रुपये काढण्यात आल्याचेही समोर आले आहे. ही रक्कम कॅनरा बँक आणि एनएसडीएल पेमेंट बँकेच्या विविध खात्यांमध्ये गेली असल्याची माहिती आहे.

 

या प्रकरणी पोलिसांनी सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद लिंक, कॉल किंवा अ‍ॅपवरील सूचना आल्यास तात्काळ खात्री करूनच पुढील कारवाई करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’; इंदापूरात नाभिक समाजाचा अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

Thursday, 1 October 2026, 16:00

नवरात्रीच्या 9 दिवसांत चेहऱ्याचा ग्लो वाढवायचाय? पार्लरला जाण्याची गरज नाही, किचनमधल्या या 3 गोष्टी ठरतील उपयोगी

Thursday, 1 October 2026, 15:50

कात्रज-कोंढवा रस्त्याची रखडलेली कोंडी सुटणार? मार्च 2027 ची डेडलाइन; 50 मीटर रुंदीकरणाचं काम वेगात

Thursday, 1 October 2026, 15:39

विधान परिषद निवडणुकीचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला! पण पुण्याच्या जागेवरून महायुतीत तणाव; वाचा विधान परिषदेच्या जागावाटपाची A टू Z स्टोरी

Thursday, 1 October 2026, 15:28

कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलंय? विभागीय आयुक्तांकडे अपील नाही! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार

Thursday, 1 October 2026, 15:08

विलास घुले हत्या प्रकरणात ट्विस्ट! जेलमधून वाल्मिक कराडचा सुग्रीव कराडला फोन; ‘त्या’ ऑडिओ क्लीपने खळबळ..

Thursday, 1 October 2026, 15:07
Next Post

पुणे ते बोरीवली प्रवास आता स्वस्त आणि मस्त! प्रवाशांची वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp