Wednesday, September 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“बापटला उचलून आपट!” डीजेच्या समर्थनात उतरलेल्या पुणेरी रॅपरच्या गाण्याने सोशल मीडियावर उडवली खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 16 September 2026, 16:34

पुणे : गणेशोत्सवातील कर्णकर्कश डीजेच्या आवाजामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्या भूमिकेवरून सध्या दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. काही नागरिकांकडून त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले जात असताना, काही जणांकडून त्याला विरोधही केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील रॅपर प्रसाद वेठेकर याने इन्स्टाग्रामवर एक रॅप व्हिडिओ शेअर करत बापट यांच्या डीजेविरोधातील भूमिकेवर टीका केली आहे.

प्रसाद वेठेकर याने न्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. बाईकवर मागे बसून रॅप सादर करताना त्याने डीजेला विरोध करणाऱ्या बापट यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. या रॅपमध्ये बापट यांच्याविरोधात आक्षेपार्ह तसेच मारहाणीचा संदर्भ देणारे शब्द वापरण्यात आले आहेत. ‘गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेला विरोध करणाऱ्या बापटांना हे माझे उत्तर आहे’, असे कॅप्शनही प्रसादने या व्हिडिओला दिले आहे.

गणेशोत्सवाची तयारी, विसर्जन मिरवणुकीतील डीजे आणि तरुणांचा उत्साह यांचा संदर्भ देत प्रसादने आपल्या रॅपमधून बापट यांच्या भूमिकेवर उपरोधिक टीका केली आहे. या व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेल्या काही शब्दांमुळे सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

प्रसाद वेठेकर याने आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर स्वतःची ओळख रॅपर, डान्सर आणि मिमिक म्हणून करून दिली आहे. त्याच्या अकाऊंटवर रॅप, डान्स आणि स्टँडअप कॉमेडीचे विविध व्हिडिओ आहेत. पुण्यातील नवले ब्रिज परिसरातील त्याच्या एका उपहासात्मक रॅप व्हिडिओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाल्याचे सांगितले जाते.

 

दरम्यान, डीजेच्या आवाजाला भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांचाही विरोध असल्याबाबत बोलताना विद्यानंद बापट यांनी आपण डाव्या विचारांचे असून नास्तिक असल्याचे म्हटले होते. उत्सवाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी धुडगूस घालणाऱ्यांना विरोध करणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती. विरोधामुळे आपल्याला भीती वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.

आता प्रसाद वेठेकरच्या रॅप व्हिडिओनंतर डीजेचा आवाज, ध्वनिप्रदूषण आणि गणेशोत्सवातील मिरवणुकांबाबतची चर्चा पुन्हा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आलेगावच्या सहकारी सोसायट्यांच्या कारभारावर लेखापरीक्षणातूनही गंभीर त्रुटी; मात्र कारवाईचा पत्ता नाही!

Wednesday, 16 September 2026, 17:06

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ! गणेशोत्सवात उघडपणे विकल्या जाणाऱ्या मोदक-पेढ्यांवर उत्पादनाची तारीखच नाही

Wednesday, 16 September 2026, 17:02

“बापटला उचलून आपट!” डीजेच्या समर्थनात उतरलेल्या पुणेरी रॅपरच्या गाण्याने सोशल मीडियावर उडवली खळबळ

Wednesday, 16 September 2026, 16:34

जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय; मराठा आरक्षणासाठी नवा आदेश जारी!

Wednesday, 16 September 2026, 16:33

मुंबईत रुग्णालयात अग्नितांडव! गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; 2 कर्मचारी होरपळले

Wednesday, 16 September 2026, 16:09

बाबीर देवस्थानच्या विकासाला मिळणार मोठं बळ? 100 एकर वनजमीन आणि ‘ब’ दर्जासाठी डॉ. आकाश कांबळेची उपमुख्यमंत्री पवांराकडे मागणी

Wednesday, 16 September 2026, 15:26
Next Post

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ! गणेशोत्सवात उघडपणे विकल्या जाणाऱ्या मोदक-पेढ्यांवर उत्पादनाची तारीखच नाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp