Wednesday, September 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ! गणेशोत्सवात उघडपणे विकल्या जाणाऱ्या मोदक-पेढ्यांवर उत्पादनाची तारीखच नाही

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 16 September 2026, 17:02

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मिठाईच्या दुकानांमध्ये मोदक, पेढे, लाडू, बर्फी यांसह विविध पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. अन्न भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) कारवाई सुरू असतानाही काही ठिकाणी मिठाईच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः खुल्या स्वरूपात विकल्या जाणाऱ्या मिठाईवर उत्पादनाची तारीख आणि ‘बेस्ट बिफोर’ची माहिती स्पष्टपणे दिली जात नसल्याने ग्राहकांना पदार्थ किती जुना आहे, याची खात्री करता येत नाही.

गणेशोत्सवात प्रसादासाठी खवा, मावा आणि मोदकांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. ग्राहकांनी विचारणा केल्यास काही विक्रेत्यांकडून ‘आजच बनवली आहे’, अशी तोंडी माहिती दिली जाते. मात्र, पदार्थावर आवश्यक माहिती उपलब्ध नसल्यास त्याची ताजेपणा, साठवणूक आणि सेवनासाठी योग्य कालावधी याबाबत ग्राहक संभ्रमात राहतात.

मिठाई तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कच्चे पदार्थ, त्यांची वाहतूक, साठवणूक तसेच दुकानातील तापमान यांचाही गुणवत्तेवर परिणाम होतो. उत्पादक, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते अशा साखळीतून मिठाई दुकानांपर्यंत पोहोचत असल्याने उत्पादनापासून विक्रीपर्यंतचा कालावधी वाढल्यास पदार्थाची गुणवत्ता कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांनी अत्यंत कमी किमतीत मिळणाऱ्या मिठाईबाबत सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी शहरातील मध्यवर्ती भागात बार्शी आणि कर्नाटकातून विक्रीसाठी आणलेला ४ हजार ६२७ किलो खवा आढळून आला. या साठ्यावर आवश्यक नामनिर्देशन नसल्याने सांगली येथील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी केली. ३३ स्वतंत्र लॉटमधून प्रत्येकी एक नमुना घेऊन तो विश्लेषणासाठी पाठविण्यात आला आहे.

 

याच काळात एफडीएच्या पथकाने शहरातील तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण १८ हजार ७०.५ किलो खवा जप्त केला. या खव्याची किंमत ४३ लाख २७ हजार ७०४ रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईत एकूण ६९ अन्न नमुने घेण्यात आले आहेत.

खुल्या स्वरूपात विकल्या जाणाऱ्या मिठाईबाबत ‘बेस्ट बिफोर’ची माहिती ग्राहकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ ‘ताजी मिठाई’ अशी तोंडी माहिती देण्याऐवजी आवश्यक माहिती विक्रीच्या ठिकाणी स्पष्टपणे देणे गरजेचे आहे. दरम्यान, पुण्यात झालेल्या कारवाईची सुरुवातीला स्थानिक एफडीए अधिकाऱ्यांना माहिती नसल्याने याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या चर्चांबाबत अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गणेशोत्सवात एफडीएची धडक कारवाई; नामांकित हॉटेल्सचे परवाने रद्द, कोटींचा गुटखा जप्त

Wednesday, 16 September 2026, 18:53

“5 ऑक्टोबरपासून दुष्काळी स्थितीचे तातडीने पंचनामे सुरू होणार” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे करणार दुष्काळी भागांची पाहणी

Wednesday, 16 September 2026, 18:37

दिशा सालियान प्रकरण पुन्हा चर्चेत; आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण, म्हणाले ‘मी कधीही…’

Wednesday, 16 September 2026, 18:37

पुण्यात डीजे चालकांवर पोलिसांचा मोठा बडगा; १४ लाखांचा ट्रक आणि साऊंड सिस्टिम जप्त

Wednesday, 16 September 2026, 18:07

“उद्धव ठाकरेंनी विचारसरणी बदलल्याने आणि हुकूमशाही चालवल्यानेच शिवसेनेत फूट पडली!” सर्वोच्च न्यायालयात खळबळजनक युक्तिवाद

Wednesday, 16 September 2026, 17:32

आलेगावच्या सहकारी सोसायट्यांच्या कारभारावर लेखापरीक्षणातूनही गंभीर त्रुटी; मात्र कारवाईचा पत्ता नाही!

Wednesday, 16 September 2026, 17:06
Next Post

आलेगावच्या सहकारी सोसायट्यांच्या कारभारावर लेखापरीक्षणातूनही गंभीर त्रुटी; मात्र कारवाईचा पत्ता नाही!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp