Tuesday, June 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हिंजवडीच्या दिशेने धावणार मेट्रो! आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास होणार सुसाट; ‘या’ तारखेपासून होणार पहिल्या टप्प्याचा शुभारंभ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 11 June 2026, 17:52

पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क आणि पुण्याच्या मध्यवर्ती भागाला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मेट्रो मार्गिका क्रमांक 3 च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण 15 जुलै रोजी होण्याची शक्यता असून, त्यामुळे दररोज हिंजवडीकडे प्रवास करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त अभिजित चौधरी यांनी याबाबत माहिती दिली. पहिल्या टप्प्यात माण ते रामनगर बाणेर दरम्यानची 12 मेट्रो स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहेत. या टप्प्यामुळे हिंजवडी आणि बाणेर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मेट्रो सेवा सुरू करण्यापूर्वी आवश्यक सुरक्षा आणि तांत्रिक चाचण्या पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यानुसार 15 ते 20 जून या कालावधीत मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीएमआरएस) प्रत्यक्ष पाहणी आणि तपासणी केली जाणार आहे. सुरक्षा मान्यता मिळाल्यानंतरच मेट्रो सेवा प्रवाशांसाठी सुरू केली जाईल.

 

दरम्यान, प्रकल्पाचे काम करणाऱ्या ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ला 30 जूनपर्यंत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर पावसाळी परिस्थिती आणि तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन 15 जुलैपासून सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रकल्पाचा उर्वरित भागही टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हाय स्ट्रीट बाणेर ते शिवाजीनगर दरम्यानची 11 स्थानके डिसेंबर 2026 पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानंतर संपूर्ण मेट्रो मार्गिका पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. तसेच स्थानकांशी संबंधित सुशोभीकरण आणि इतर पूरक कामे मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

हिंजवडी आयटी पार्क हे देशातील प्रमुख माहिती-तंत्रज्ञान केंद्रांपैकी एक मानले जाते. येथे दररोज हजारो कर्मचारी कामासाठी ये-जा करतात. त्यामुळे मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होण्यास, प्रवासाचा वेळ वाचण्यास आणि सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे ते शिर्डी नवी रेल्वे लवकरच होणार सुरु; बस-खाजगी वाहनांच्या कटकटीतून प्रवाशांची सुटका

Tuesday, 16 June 2026, 13:29

नीट फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकार ‘ॲक्शन मोड’ मध्ये; पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी

Tuesday, 16 June 2026, 13:16

राजगड पोलिसांचा ‘मिशन क्लीन’, अवैध धंद्यांविरोधात पीआय संतोष जाधव आक्रमक

Tuesday, 16 June 2026, 12:35

भोर-राजगडमधील ताडी विक्रीची सखोल चौकशी करा! अल्पवयीनाकडून झालेल्या खूनप्रकरणानंतर ताडी विक्री केंद्रांवर संयुक्त कारवाईची नागरिकांची मागणी

Tuesday, 16 June 2026, 12:29

राजगड पोलिसांचा धडाकेबाज ‘सपाटा’; नवीन पोलीस निरीक्षकांच्या पदभार स्वीकारताच मटका अड्ड्यावर कारवाईचा दणका

Tuesday, 16 June 2026, 12:23

सह्याद्री हॉस्पिटलचे फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. नाना कुंजीर यांच्यावर रुग्णाच्या मुलाकडून हल्ला

Tuesday, 16 June 2026, 12:14
Next Post

"आता अनावश्यक हस्तक्षेप खपवून घेणार नाही!"; सुनेत्रा पवारांनी पक्षनेत्यांना सुनावले खडे बोल; म्हणाल्या "हट्ट पुरवला, पदं दिली पण आता....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.