Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : धडाकेबाज तपास, शेकडो गुन्ह्यांचा उलगडा! लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव सेवानिवृत्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 February 2026, 13:54

Loni Kalbhor News: लोणी काळभोर, ता. 28 : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अनिल सिताराम जाधव हे शनिवारी (ता. 28 फेब्रुवारी) तब्बल 35 वर्षांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. गुन्हे उघडकीस आणण्यातील त्यांची तडफ, तपासातील काटेकोरपणा आणि सहकाऱ्यांशी जपलेले स्नेहबंध यामुळे पोलीस दलात त्यांच्या कामाची उणीव निश्चितच भासणार आहे.

सोलापूर येथे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अनिल जाधव यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पोलीस भरतीची तयारी सुरू केली. त्यानंतर ते सोलापूर शहर पोलीस दलात पोलीस अंमलदार म्हणून दाखल झाले. सेवाकाळात त्यांनी जेलरोड, फौजदारी चावडी, गुन्हे शाखा तसेच जोन्स स्क्वॉडमध्ये काम करताना अनेक धाडसी कारवाया केल्या. सन 2008 ते 2010 या कालावधीत सोलापूर शहरात घरफोडी व जबरी चोरीचे 100 ते 150 गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना महाराष्ट्र पोलीस दलाकडून उत्कृष्ट कामगिरी, सातत्यपूर्ण सेवा आणि क्लिष्ट गुन्ह्यांची उकल केल्याबद्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

पुढे 2013 साली अनिल जाधव यांनी सेवांतर्गत परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले. सन 2024 ते 2026 या काळात सुमारे 18 महिने त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तपास पथकाचे प्रमुख म्हणून काम केले. या काळात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, जबरी चोरी, महिलांविषयीचे गुन्हे तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करून 50 हून अधिक गुन्ह्यांचा छडा लावला. संपूर्ण सेवाकाळात 300 ते 350 पेक्षा अधिक गुन्हे उघडकीस आणण्याची उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या नावावर आहे.

दरम्यान, लोणी काळभोर परिसरातील प्रेमप्रकरणातून घडलेल्या खुनाचा गुंतागुंतीचा तपास त्यांनी कौशल्याने उलगडला. तसेच सोलापूर येथे कर्तव्य बजावत असताना घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपींना अटक करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नागरिकांवर जीवघेणे हल्ले करणाऱ्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या एका सोनसाखळी चोरट्याला त्यांनी अचूक वर्णनावरून ओळख पटवून बेड्या ठोकल्या. त्या आरोपीवर पोलिसांनी 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

 

कर्तव्य बजावत असतानाच अनिल जाधव यांचा विवाह पोलीस दलातील सहकाऱ्याशी झाला. त्यांच्या पत्नी अनिता अशोक चव्हाण या पोलीस दलात सहायक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबात मोठी मुलगी श्वेता बँक ऑफ बडोदामध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे, तर लहान मुलगी निकिता उच्च शिक्षण घेत आहे. मुलगा रितेश स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. तीन दशकांहून अधिक काळ पोलीस सेवेत राहून गुन्हेगारीविरुद्ध लढणारे अनिल जाधव सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांच्या धाडसी कामगिरीच्या आठवणी सहकारी आणि नागरिकांच्या मनात कायम राहतील.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर

Friday, 4 September 2026, 22:53

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46
Next Post

Crime News: शिक्षकी पेशाला काळिमा! बोर्ड परीक्षा केंद्रात विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन; शिक्षकाचे तात्काळ निलंबन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp