पुणे: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Lakshman Hake) विमान अपघातानंतर राजकीय वर्तुळात विविध आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच ओबीसी (Ajit Pawar Death) नेते लक्ष्मण हाके यांनी या चर्चांवर (Amol Mitkari) तीव्र प्रतिक्रिया देत काही नेत्यांवर थेट निशाणा साधला आहे. अपघाताच्या तपासाआधीच बॉम्बस्फोट, घातपात किंवा आत्मघातकी हल्ल्याच्या शक्यता मांडल्या जात असल्याने राजकीय वातावरण अधिक तापले असून, यावर हाके यांनी “पुरावे असतील तर तपास यंत्रणांना द्यावेत, अन्यथा केवळ प्रसिद्धीसाठी विधानबाजी करू नये,” असे स्पष्ट मत व्यक्त केले. (Maharashtra Politics)

हाके यांनी खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या विधानांचा संदर्भ देत, अजित पवार यांच्या मृत्यूचे राजकारण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. “कोणी विमानात बॉम्ब असल्याचे म्हणत आहे, तर कोणी आत्मघातकी हल्ल्याची शक्यता व्यक्त करत आहे. या सर्व विधानांमागे तथ्य नसून स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्याची धडपड दिसते,” असे ते म्हणाले. तसेच कोणाकडे ठोस पुरावे असतील तर ते मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच तपास यंत्रणांकडे सादर करावेत, अशीही त्यांनी मागणी केली.

दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनी यापूर्वी केलेल्या विधानांमध्ये विमान चालवणाऱ्या कंपनीवर संशय व्यक्त करत पायलटला संमोहन केले गेले होते का, किंवा विम्याच्या आमिषातून काही कट रचला गेला होता का, अशा शंका उपस्थित केल्या होत्या. त्यांनी विमान कंपनीच्या पायलटांचा 50 कोटी रुपयांचा विमा काढण्यात आल्याचा मुद्दाही उपस्थित केला असून या सर्व बाबींची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर तपास सुरू असतानाच विविध राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. तपास यंत्रणांचा अंतिम अहवाल येण्यापूर्वीच सुरू झालेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण अधिक संवेदनशील झाले असून, अधिकृत निष्कर्षानंतरच अपघाताचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.







