Tuesday, July 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न! पुण्यात ८०० वाहनांचे ‘फिटनेस’ प्रमाणपत्र गायब; आरटीओचा कारवाईचा इशारा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 19 July 2026, 19:45

पुणे : सुरक्षित शालेय विद्यार्थी वाहतुकीसाठी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने राबविलेल्या विशेष मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील सुमारे ९० टक्के शालेय बस आणि व्हॅन यांनी वैध ‘फिटनेस’ प्रमाणपत्र घेतले असले, तरी अद्याप ८१२ वाहनांकडे हे प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले आहे. अशा वाहनांवर आता आरटीओने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आरटीओने सर्व स्कूल बस आणि व्हॅन चालकांना ‘फिटनेस’ प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन केले होते. यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली असून शनिवार आणि रविवारीही तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एकूण ७,४५२ वाहनांपैकी ७,३३९ या स्कूल बस आहेत. त्यापैकी ६,५४६ बसांनी वैध ‘फिटनेस’ प्रमाणपत्र घेतले असून ७९३ बसांकडे अद्याप हे प्रमाणपत्र नाही. तसेच ११३ शालेय व्हॅनपैकी ९४ व्हॅनकडे ‘फिटनेस’ प्रमाणपत्र आहे, तर १९ व्हॅन अद्याप प्रमाणपत्राविना सुरू असल्याचे आढळून आले आहे.

 

स्कूल बस नियमावलीनुसार विद्यार्थ्यांची व्यावसायिक स्वरूपात वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाची दरवर्षी ‘फिटनेस’ तपासणी करणे बंधनकारक आहे. या तपासणीत वाहनाची तांत्रिक स्थिती, सुरक्षितता आणि इतर आवश्यक बाबींची पडताळणी केली जाते.

आरटीओने वैध ‘फिटनेस’ प्रमाणपत्र नसलेल्या शालेय वाहनांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच पालकांनी आपल्या मुलांची वाहतूक करणाऱ्या बस किंवा व्हॅनचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना आणि सुरक्षा नियमांचे पालन होत आहे का, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय खासगी वाहनांमधून बेकायदेशीरपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जाणार असल्याचे आरटीओने स्पष्ट केले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सायबर गुन्हेगारांचे पुण्यात ‘नेटवर्क’ सक्रिय! कोट्यवधींच्या फसवणुकीची साखळी उघड

Monday, 20 July 2026, 22:59

औंधमधील हॉटेलमध्ये हप्तावसुलीसाठी तोडफोड; तिघांना अटक, मुख्य आरोपी फरार

Monday, 20 July 2026, 22:29

NEET प्रकरण, शिक्षक भरतीसह विविध मागण्यांसाठी इंदापूरमध्ये मोर्चा; तहसीलदारांना निवेदन

Monday, 20 July 2026, 22:26

पुण्यात ‘कॉक्रोज जनता पार्टी’च्या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Monday, 20 July 2026, 21:33

बारामतीत कृत्रिम दूधनिर्मितीच्या संशयित रॅकेटचा पर्दाफाश? आठ जणांवर गुन्हा

Monday, 20 July 2026, 20:54

मेटल डिटेक्टरने केला गेम! सुनावणीवरून कारागृहात परततांना आरोपीची अंगझडती घेतली अन् जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले..

Monday, 20 July 2026, 20:15
Next Post

विठुरायाच्या भेटीसाठी पालख्या दिंड्या पंढरीकडे मार्गस्थ ..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.