Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘त्यानं तिला चटके दिले, डोक्यात इस्त्री घातली, दारू पिऊन तो तिला मारायचा’ रक्षाबंधनाअगोदरच पुण्यात बहिणीचा मृत्यू; भावानं फोडला टाहो

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 27 August 2026, 18:19

पुणे: बहिण-भावाच्या नात्याचा उत्सव असलेल्या रक्षाबंधनाच्या काही तास आधी पुण्यातील वाकड परिसरातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शिल्पा सचिन गवारे (वय ३२) या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला. सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून हा प्रकार घडल्याचा आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. लेकीचा सणाच्या तोंडावरच मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शिल्पा यांचा विवाह वाकड परिसरातील गवारे कुटुंबात झाला होता. लग्नानंतर काही काळाने त्यांच्या संसारात वाद सुरू झाल्याचे माहेरच्यांनी सांगितले. पती सचिन गवारे, सासरे उत्तम गवारे आणि सासू संजीवनी गवारे यांच्याकडून शिल्पा यांचा कथितरित्या शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. माहेरच्या मालमत्तेतील हिस्सा घेऊन येण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता. पैसे आणि संपत्तीच्या मागणीवरून तिला शिवीगाळ आणि मारहाण केली जात असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.

शिल्पा यांच्या भावानेही सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, सचिन हे दारूच्या नशेत शिल्पा यांना मारहाण करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या डोक्यात इस्त्री मारल्याचे, तसेच यापूर्वीही इस्त्रीचे चटके दिल्याचे भावाने सांगितले. आज ना उद्या परिस्थिती सुधारेल, या आशेने कुटुंबीय शांत राहिल्याचेही त्याने सांगितले.

शिल्पा अत्यंत संयमी स्वभावाच्या होत्या. त्यामुळे त्या स्वतःहून असे टोकाचे पाऊल उचलतील, यावर विश्वास बसत नसल्याचे भावाने सांगितले. मालमत्तेच्या वादाबाबत शिल्पा यांनी भावाशी बोलताना, “भाऊ, तू जिथे सांगशील तिथे मी सही देते. मला सासरच्यांचं ऐकायचं नाही. मला शेवटपर्यंत आपलं भाऊ-बहिणीचं नातं जपायचंय,” असे म्हटल्याचेही त्याने सांगितले.

 

रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशीच बहिणीचा मृत्यू झाल्याने तिच्या भावासह माहेरच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहायला मिळाला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, शिल्पा यांच्या मृत्यूमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पिंपळवंडीतील बालिकेवर अत्याचार-हत्या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पीडित कुटुंबाची भेट; प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार

Thursday, 27 August 2026, 22:55

पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यू अन् स्वाईन फ्लूचा विळखा तीव्र; अवघ्या २५ दिवसांत नोंदवले गेले तब्बल २०५ रुग्ण

Thursday, 27 August 2026, 22:36

अखेर पुणेकरांची प्रतिक्षा संपणार! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कधी धावणार? तारीख ठरली; प्रशासनाची धावपळ

Thursday, 27 August 2026, 22:18

लोणी काळभोर येथील अट्टल गुन्हेगार राज पवार एक वर्षासाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध

Thursday, 27 August 2026, 21:53

सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा! उष्णता वाढणार अन् पावसाची तूट निर्माण होणार; हवामान तज्ज्ञांचा इशारा

Thursday, 27 August 2026, 21:32

भिगवणच्या अशोक लॉजमध्ये वेश्यागमन? नागरिकांमधून संताप व्यक्त; पहा व्हायरल Video

Thursday, 27 August 2026, 20:39
Next Post

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी शिकण्यासाठी थेट एका वर्षाची मुदतवाढ जाहीर; नेमकं कोणत्या अति-शर्ती लागू? वाचा सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp