Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आता हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार; ‘म्हाडा’ कडून महत्वाची अपडेट समोर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 25 November 2026, 20:57

पुणे : हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे ४ हजार ४६२ सदनिकांची सोडत १ डिसेंबर रोजी काढण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ही सोडत होणार आहे. या सोडतीसाठी अर्जांची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली असून, एकूण २ लाख ६८ हजार ६७० अर्ज पात्र ठरले आहेत. तर ५ हजार ३९८ अर्ज बाद करण्यात आले आहेत.

म्हाडाच्या पुणे मंडळाने १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनांतील सदनिकांच्या वितरणासाठी २४ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या योजनेत पुणे महापालिका क्षेत्रातील १ हजार ४६८, पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील १ हजार ४०६ आणि पीएमआरडीए क्षेत्रातील १ हजार ५८८ घरांचा समावेश आहे. अशा एकूण ४ हजार ४६२ घरांची सोडत काढण्यात येणार आहे. याशिवाय मागील दोन सोडतींमध्ये शिल्लक राहिलेल्या ५५८ घरांचाही या प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे.

म्हाडाच्या घरांसाठी २४ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती. या घरांसाठी एकूण ३ लाख २५ हजार ७७ जणांनी अर्ज केले. त्यापैकी प्रत्यक्ष सोडतीत सहभागी होण्यासाठी २ लाख ७४ हजार ४०८ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीदरम्यान ५ हजार ३९८ अर्ज बाद ठरले. यामध्ये प्रामुख्याने उत्पन्नाचा चुकीचा दाखला सादर केलेल्या अर्जदारांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. संबंधित अर्जदारांना योग्य कागदपत्रे सादर करण्यासाठी एक दिवसाची मुदतही देण्यात आली होती.

या सोडतीची अंतिम पात्र अर्जदारांची यादी शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर १ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे अंतिम यादीत आपले नाव येते का, याकडे हजारो अर्जदारांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आता हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार; ‘म्हाडा’ कडून महत्वाची अपडेट समोर

Wednesday, 25 November 2026, 20:57

Loni Kalbhor News : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला! वडिलांचा मृत्यू तर मुलगा, आई अन् मुलगी जखमी; ट्रकचालकावर गुन्हा दाखल

Wednesday, 25 November 2026, 19:49

लोणी काळभोर येथील पालखी मैदानाजवळ गांजा ओढताना दोघे पोलिसांच्या जाळ्यात!

Wednesday, 25 November 2026, 19:11

लोणी काळभोर येथील गावठी दारू विक्रीच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा; एकाला अटक

Wednesday, 25 November 2026, 19:03

महावितरणच्या कामाचा बळी? न्हावरे-इनामगाव रस्त्यावर निर्वी येथे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

Wednesday, 25 November 2026, 18:58

गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा वाद पुन्हा न्यायालयात; महायुतीच्या सर्व संचालकांना नोटीस बजावण्याचे आदेश!

Wednesday, 25 November 2026, 18:57
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp