Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अपघातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली भेट! मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 13 July 2026, 16:48

राहुलकुमार अवचट

पुणे: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान आज सकाळी सासवड–जेजुरी मार्गावरील जेजुरी-बेलसर परिसरात झालेल्या अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर काही वारकरी जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली.

यावेळी त्यांनी उपचाराधीन वारकऱ्यांच्या प्रकृतीची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या. अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून जखमी वारकऱ्यांवर शासनाच्या वतीने मोफत उपचार करण्यात येतील. तसेच आवश्यकतेनुसार आर्थिक मदतही उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

यावेळी जेजुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयदीप दिलीप बारभाई, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, भावार्थ देखणे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, जखमी वारकऱ्यांच्या उपचारामध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासन अपघातग्रस्त वारकरी व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.

आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा नियमित आढावा घेऊन वारी मार्गावरील आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने वाहन चालवून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री थरार! गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर दरोडेखोरांचा हल्ला; महिलांच्या अंगावरील दागिन्यांची लूट

Wednesday, 22 July 2026, 22:56

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! शहरात पाणीकपात होणार की नाही? महापौरांनी केली मोठी घोषणा!

Wednesday, 22 July 2026, 22:31

पुण्यातील नामांकित हॉटेल्स अन् रेस्टॉरंट्सवर FDAची कारवाई; १२ जणांचे परवाने तडकाफडकी निलंबित

Wednesday, 22 July 2026, 22:00

पळसनाथ विद्यालयात रंगला विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा! भक्तिमय वातावरणात विठूनामाचा जयघोष…

Wednesday, 22 July 2026, 21:53

प्रेमासाठी नव्हे तर पैश्यांसाठी ठेवले संबंध! शिक्षिकेचे अनेक वर्षांपासून मित्रासोबत संबंध; मित्राची नियत फिरली अन् घडलं भयंकर

Wednesday, 22 July 2026, 21:15

वंचित बहुजन आघाडीची उद्या ‘महाराष्ट्र बंद’ची हाक! पुण्यात सकाळी १० वाजता होणार आंदोलनाला सुरुवात

Wednesday, 22 July 2026, 20:23
Next Post

'मी रेशनकार्ड बनवून देतो, पण त्याबदल्यात मला.." रेशनकार्डच्या नावाने बोलावलं अन् महिलेला केली सरळ 'ती' मागणी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.