Tuesday, June 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भीमाशंकरचे दरवाजे उघडले, पण ‘नो पास, नो एन्ट्री’! पोलिसांचा भाविकांना सक्त इशारा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 16 June 2026, 18:55

पुणे: भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले असले तरी दर्शनासाठी विशेष नियम लागू करण्यात आले आहेत. सध्या केवळ ऑनलाइन नोंदणी करून दर्शन पास मिळवलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. दररोज फक्त 1000 भाविकांना दर्शनाची परवानगी दिली जात असल्याने पास नसलेल्या भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश मिळणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पोलिस प्रशासनाने भाविकांना आवाहन केले आहे की, ऑनलाइन नोंदणी आणि दर्शन पास मिळाल्यानंतरच भीमाशंकर येथे यावे. मंदिर दर्शनासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन बुकिंग व्यवस्थेला मोठा प्रतिसाद मिळाला असून सुरुवातीच्या 7 दिवसांसाठी उपलब्ध असलेले सर्व स्लॉट पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे सध्या नवीन नोंदणी प्रक्रिया तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

पुढील 7 दिवसांसाठी दर्शनाची व्यवस्था आणि नवीन स्लॉट उपलब्ध करून देण्याबाबत देवस्थान प्रशासन लवकरच निर्णय घेणार आहे. त्यामुळे अधिकृत सूचना जाहीर झाल्यानंतरच भाविकांनी नोंदणी करावी, असे सांगण्यात आले आहे.

 

30 जूनपर्यंत दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या भाविकांनी दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंदिर प्रशासन, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक नागरिक यांना सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

दरम्यान, नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी आवश्यक सुविधा आणि गर्दी व्यवस्थापनाची कामे सध्या सुरू आहेत.

कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून भीमाशंकर मंदिर परिसरातील नवीन सभामंडप आणि इतर विकासकामांसाठी मंदिर 9 जानेवारी 2026 पासून बंद ठेवण्यात आले होते. नंतर ही मुदत 31 मे 2026 पर्यंत वाढवण्यात आली होती. सामान्य परिस्थितीत सुमारे 1 वर्ष लागणारे सभामंडपाचे काम अवघ्या 5 महिन्यांत पूर्ण करण्यात आले आहे.

सध्या मुख्य सभामंडप, दर्शनबारी, स्वच्छता व्यवस्था आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा तयार करण्यात आल्या असून उर्वरित किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; गांजा आणि अफीमसह चौघे जेरबंद

Tuesday, 16 June 2026, 22:56

जेजुरीत भाविकांचा नंगानाच! दारू पिऊन स्थानिकांना बेदम मारहाण; नागरिकांमध्ये प्रचंड संताप

Tuesday, 16 June 2026, 22:33

अश्लील हातवारे अन् छेडछाड! आळंदीत विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या नराधमाला नागरिकांनी दिला चोप

Tuesday, 16 June 2026, 22:02

नेत्याच्या फोनवर सायरन वाजला अन् धाबे दणाणले! केंद्र सरकारची ‘अलर्ट सिस्टिम’ तातडीने बंद

Tuesday, 16 June 2026, 21:24

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी दत्तात्रय कदम! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र; पक्षासाठीचे योगदान व निष्ठा पाहून निवड

Tuesday, 16 June 2026, 20:57

“अगं आता आपण लग्न करणार आहे” लग्न ठरल्यावर तरुणीला लॉजवर नेलं, जबरदस्ती संबंध ठेवले अन् लग्नाची तारीख जवळ आल्यावर…

Tuesday, 16 June 2026, 20:32
Next Post

Daund Crime : रेल्वे सुरक्षा दलाच्या निरीक्षकांच्या बंगल्यावर चोरट्यांचा डल्ला; 20 लाखांच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.