Baramati Crime : बारामती, ता. 17 : बारामती येथील शिवाजी चौकातील जबरी चोरीचा गुन्हा शहर पोलिसांनी उघडकीस आणला असून याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे.

सिद्धार्थ संतोष घाडगे (वय-31, रा. सटवाजी नगर, इंदापूर चौक, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याची रवानगी येरवडा केंद्रीय कारागृह येथे करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. 08) बारामती शहरातील शिवाजी चौक परिसरात फिर्यादीस मारहाण करून जबरदस्तीने रोख रक्कम काढून घेतल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा भारतीय न्याय संहिता 2023 कलम 309 (4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा नोंद होताच शहर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण, स्थानिक माहिती आणि सखोल चौकशीच्या आधारे आरोपी सिद्धार्थ घाडगे याचा सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपीस ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. अंगझडती दरम्यान गुन्ह्यातील रकमेपैकी काही रक्कम जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता प्रथम पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याची रवानगी येरवडा केंद्रीय कारागृह येथे करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे तसेच पोलीस हवालदार सुलतान डांगे, अमोल शिंदे, पोलीस शिपाई विशाल चौधर, सागर जामदार, विशाल शिंदे, अक्षय सिताफ, नेवसे यांनी केली.






