पुणे : महापालिकेच्या विविध जलकेंद्रांमध्ये विद्युत आणि तातडीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने गुरुवारी (27 ऑगस्ट) शहरातील अनेक प्रमुख भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिली.

मध्यवर्ती पेठा आणि नरवीर तानाजी मालुसरे रस्ता अर्थात सिंहगड रस्ता परिसरात मात्र नियमित पाणीपुरवठा होणार आहे. इतर भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पर्वती परिसरातील सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरचा काही भाग, महर्षीनगर, चिंतामणीनगर, गंगाधाम, अप्पर व लोअर इंदिरानगर, लेकटाउन, डायस प्लॉट, सॅलिसबरी पार्क, पर्वती गावठाण आणि जनता वसाहत परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेअंतर्गत लोहगाव, कळस, धानोरी, टिंगरेनगर, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, खराडी तसेच आळंदी नगर परिषद आणि लगतच्या परिसरालाही पाणीपुरवठा होणार नाही.
कोथरूड, बावधन आणि कर्वेनगर परिसरातील बावधन, भुसारी कॉलनी, पौड रस्ता, पौड फाटा, मयूर कॉलनी, कर्वे रस्ता, विठ्ठल मंदिर, सहवास, गोसावी वस्ती, करिश्मा परिसर, नळस्टॉप ते दशभुजा गणपती, मंगेशकर रुग्णालय, महात्मा सोसायटी, वारजे माळवाडी, काकडे सिटी आणि कॅनॉल रस्ता या भागांमध्येही पाणीपुरवठा बंद राहील.
बाणेर, बालेवाडी आणि पाषाण परिसरातील बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, सूस रोड, भूगाव, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, गणराज चौक आणि पॅनकार्ड क्लब परिसराचा पाणीपुरवठाही बंद राहणार आहे.
औंध, शिवाजीनगर, गोखलेनगर, बोपोडी, विद्यापीठ परिसर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, खडकी आणि सकाळनगर परिसरातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
कात्रज, धनकवडी, संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव, वंडर सिटी, बालाजीनगर, सुखसागरनगर, कात्रज गावठाण आणि येवलेवाडी तसेच खडकी कँटोन्मेंट, मुळा रोड, एमईएस, हरिगंगा सोसायटी, शिवणे, उत्तमनगर, रामनगर आणि कोंढवे धावडे परिसरातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
देखभाल-दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी काही भागांमध्ये कमी दाबाने किंवा उशिराने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.







