Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात अजितदादांच्या ‘वर्चस्वाला’ आव्हान? तडजोडी, फोडाफोडी आणि ‘आयात’ उमेदवारांवरच निवडणुका लढवण्याची वेळ…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 25 November 2025, 21:28
Ajit Pawar: A challenge to Ajit's 'dominance' in Pune district? Time to fight elections with compromises, divisiveness and 'imported' candidates...

पुणे: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत (Ajit Pawar) निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री (Pune Election) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता आपल्या पारंपरिक (Maharashtra Politics) बळावर लढणे कठीण झाल्याचे चित्र दिसत आहे. भाजपच्या वाढत्या ताकदीमुळे आणि इतर पक्षांच्या दबावामुळे अजित पवारांना स्वतःच्या पक्षाच्या उमेदवारांऐवजी इतर पक्ष, गट आणि स्थानिक नेते यांच्याशी फोडाफोडी व तडजोड करूनच मैदानात उतरावे लागलं आहे. (Breaking News)

 

भोर, जेजुरी, राजगुरुनगर (खेड), इंदापूर, तळेगाव ढमढेरे, फुरसुंगी अशा महत्त्वाच्या नगरपरिषदा-नगरपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला स्वबळावर तुल्यबळ उमेदवार उभे करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे भाजप, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना, शरद पवार गट आणि स्थानिक स्वतंत्र गटांकडून उमेदवार घेतले गेले किंवा पक्षामध्ये सामील केले गेले.

उदाहरणार्थ, बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतमध्ये कट्टर विरोधक रंजन तावरे यांच्याबरोबर आघाडी करावी लागली. जेजुरी नगरपरिषदेत माजी नगरसेवक आणि सर्वपक्षीय वर्चस्व असलेल्या दिलीप बारभाई यांचा मुलगा अजित गटात घेऊन आला. भोर नगरपरिषदेतील रामचंद्र आचारे यांना पक्षात आणले. खेड-राजगुरुनगरमध्ये तुल्यबळ उमेदवार नसल्याने प्रताप आहेर यांना नगराध्यक्षपदासाठी निवडले. तळेगाव ढमढेरे येथे भाजपचे प्रबळ वर्चस्व असल्यामुळे अडीच वर्षे नगराध्यक्षपदाची तडजोड करावी लागली, तर फुरसुंगी नगरपंचायतमध्ये शिवसेनेबरोबर तडजोड केली गेली.

या सर्व प्रक्रियेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. बाहेरून आयात केलेल्या उमेदवारांना संधी दिल्याने नाराजी वाढली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः ‘त्यांच्या खास स्टाइल’ने कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ग्रामीण भागात त्यांचे राजकीय वर्चस्व आता पूर्वीसारखे राहिलेले नाही.

यातूनच दिसतं की, भाजप पुणे जिल्ह्यात आपले पाय घट्ट रोवण्यास यशस्वी झाला आहे आणि अजित पवारांचा पक्ष आता फोडाफोडी व तडजोडींच्या जोरावरच निवडणूक लढवित आहे. या निवडणुकांमुळे पुणे जिल्ह्यातील बदलते राजकीय समीकरण स्पष्ट दिसत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Uruli Kanchan News: Shopkeeper attacked by a thief in Uruli Kanchan; There is a stir in the area..

Uruli Kanchan News: उरुळी कांचन येथे बेवड्याकडून दुकानदारावर चाकू हल्ला; परिसरात खळबळ ..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.