Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात गोळीबाराचा भयंकर थरार! जुन्या भांडणाचा राग अन् थेट पाठीत घातली गोळी; पोलिसांनी फक्त ८ तासांत आवळल्या आरोपीच्या मुसक्या

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 16 October 2026, 14:37

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात जुन्या वादातून एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नसरापूर-भोर रस्त्यावरील कातुर्डेवाडी येथे मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. या हल्ल्यात विजय मारुती वसले (वय ४७, रा. मालवली, ता. राजगड) यांच्या पाठीत गोळी लागली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी अवघ्या आठ तासांत मुख्य आरोपीला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने विजय वसले यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात वसले यांच्या पाठीत गोळी घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने भोर येथे प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्यांच्या पाठीत अडकलेली गोळी बाहेर काढली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी पोलिसांना तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर राजगड पोलिसांनी विविध पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाला वेग दिला.

या तपासादरम्यान पोलिसांनी मुख्य आरोपी ओंकार बाळू जाधव (रा. मालवली, ता. राजगड) याला घटनेनंतर अवघ्या आठ तासांत अटक केली. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या वेगवान तपासामुळे त्याचा शोध लवकर लागला.

 

या गोळीबार प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारामागील नेमके कारण, जुन्या वादाचे स्वरूप आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लोणी काळभोरच्या ‘चटपटा जंक्शन’ मालकाच्या घरी घरफोडी; 21 लाखांचे सोने लंपास

Monday, 19 October 2026, 11:14

‘डीएसके’च्या 131 मालमत्तांच्या लिलावाला न्यायालयाचा नकार ठेवीदारांच्या परताव्याचा मार्ग मात्र खुला; 11 हजारांहून अधिक ठेवीदारांचे 610 कोटींपेक्षा जास्त रुपये अडकले…

Monday, 19 October 2026, 11:08

“काय गं, माझे कपडे चोरतेस का?” लोणी काळभोरमध्ये कपडेचोरीच्या चर्चेवरून शेजाऱ्यांमध्ये वाद, महिलेवर लाकडी फळीने वार; दोघांवर गुन्हा दाखल

Monday, 19 October 2026, 11:01

टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलीस ‘अलर्ट’ मोडवर; नेमकं कारण काय? जाणून घ्या

Monday, 19 October 2026, 10:29

“मला नकार देण्याची शिक्षा मृत्यू?” एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय दामिनीवर चाकूने 17 ते 18 वार करून हत्या

Monday, 19 October 2026, 10:04

“गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे का?” राणा सूर्यवंशी हल्ल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंनी सरकारला घेरलं

Monday, 19 October 2026, 9:47
Next Post

आधी म्हणाले लोहगड पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला अन् आता कुंटुंबीय पलटले; आता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा दावा, नेमकं प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp