Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नोकरीची सुवर्णसंधी! पीएमपीएलमध्ये 4 हजार चालक-वाहकांची मेगाभरती; पुणे-पिंपरी-चिंचवडमधील तरुणांसाठी आनंदाची बातमी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 14 June 2026, 16:36

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात लवकरच 1,500 नवीन बसगाड्यांचा समावेश होणार असून, या बससेवेचे संचालन करण्यासाठी 4 हजार चालक आणि वाहकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेत 2 हजार चालक आणि 2 हजार वाहकांची पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांचा झपाट्याने विस्तार होत असून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्याही सातत्याने वाढत आहे. वाढत्या मागणीच्या तुलनेत काही मार्गांवर बसगाड्यांची संख्या अपुरी पडत असल्याने पीएमपीएमएलने चालू वर्षात 1,500 नवीन बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर त्यांचे नियमित आणि प्रभावी संचालन करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. यासाठी महामंडळाने 4 हजार चालक-वाहकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. भरतीसाठी आवश्यक निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी एजन्सी निवडण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे. एजन्सीची नियुक्ती झाल्यानंतर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला गती मिळणार आहे.

 

पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी सांगितले की, पुणेकरांना अधिक चांगली, सुरक्षित आणि वेळेवर सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यासाठी नवीन बस ताफ्यात समाविष्ट करण्यात येत आहेत. या बसचे सुरळीत संचालन होण्यासाठी चालक आणि वाहकांची संख्या वाढविणे आवश्यक असल्याने ही भरती करण्यात येत आहे.

नवीन कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीनंतर बसफेऱ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल. त्यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहण्यात कमी वेळ जाईल आणि सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक कार्यक्षम होईल. या उपक्रमामुळे एकीकडे पीएमपीएमएलच्या सेवेचा दर्जा उंचावणार आहे, तर दुसरीकडे 4 हजार तरुणांसाठी रोजगाराचे नवे दरवाजे उघडणार आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“गणेशोत्सवाला विरोध नाहीच…” विद्यानंद बापटांनी मांडली स्पष्ट बाजू;प्रत्येक मुद्द्यावर काय म्हणाले?

Friday, 4 September 2026, 18:38

अंमली पदार्थापासून दूर रहा, नाहीतर भविष्य उध्वस्त होईल: पोलिस उपनिरीक्षक सविता काळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

Friday, 4 September 2026, 18:18

शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून शिक्षिकेची 7 लाखांची फसवणूक,

Friday, 4 September 2026, 17:54

पुणे बाजार समितीच्या उपसभापतीपदी नानासाहेब आंबनावे बिनविरोध

Friday, 4 September 2026, 17:37

पुणे जिल्ह्यातील 887 ग्रामपंचायतींचे प्रशासक झाले ‘बिनपत्त्याचे’; सहा महिन्यांची मुदत संपली, शासनाचे नवे आदेश कुठे?

Friday, 4 September 2026, 17:28

कंटेनरच्या धडकेत 75 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,सरडेवाडी टोलनाक्याजवळ अपघाताची घटना; चालकाविरुद्ध इंदापूर पोलिसांत गुन्हा

Friday, 4 September 2026, 17:07
Next Post

शिरूर तालुक्यात खाजगी क्लासेसचा सुळसुळाट; नियम धाब्यावर, प्रशासनाची डोळेझाक?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp