Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : पतंग उडवताना सहाव्या मजल्यावरून पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 10 January 2026, 19:18
Pune

photo- social media

Pune : कात्रजमधील आंबेगाव खुर्द परिसरात पतंग उडवित असताना सहाव्या मजल्यावरून पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील जिन्यांना सुरक्षेसाठी कठडे नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मृत मुलाचे नाव श्लोक नितीन बांदल (वय 12 रा. स्वरा क्लासिक इमारत, सिद्धिविनायक सोसायटी, आंबेगाव खुर्द, कात्रज) असे आहे. याप्रकरणी श्लोकचे मामा अमोल सुभाष इंगवले (वय-35, रा. ओैंदुबर निवास, कात्रज गावठाण) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव खुर्द येथील एका गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पाच्या शेजारील सोसायटीत बांदल कुटुंब वास्तव्यास आहे. श्लोक इयत्ता पाचवीत शिकत होता. त्याचे वडील खासगी कंपनीत कार्यरत आहेत. गुरुवारी (ता. 8) शाळा सुटल्यानंतर सायंकाळी सुमारे पाच वाजता श्लोक पतंग उडविण्यासाठी जवळील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत गेला. यावेळी सहाव्या मजल्यावर तोल गेल्याने तो खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन चोरमले आणि सहायक निरीक्षक भोजलिंग दोडमिसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चौकशीत इमारतीचे काम सुरू असून जिन्यांना कोणतेही संरक्षक कठडे नसल्याचे निष्पन्न झाले. बांधकाम व्यावसायिकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कर्जाच्या विळख्यातून सुटका! राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जात मोठी सवलत

Wednesday, 8 April 2026, 9:46

अमेरिका सांगतंय अन् पाकिस्तान लिहितंय? मध्यस्थीचा आणला आव; शरीफ यांच्या ‘Draft’ ट्विटने जगात खळबळ

Wednesday, 8 April 2026, 9:39

बलात्कारही केला अन् जमिनीही हडपल्या! भोंदू खरातच्या पापाचा घडा भरला; नराधमाला होणार कठोर शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 9:20

ती आत कपडे बदलत होती अन् नीच दुकानदार कॅमेऱ्यातून पाहत होता; पुण्यातील संतापजनक घटना

Wednesday, 8 April 2026, 9:04

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45

पाकिस्तानने केलेल्या मध्यस्थीनंतर इराण-अमेरिका युद्ध थांबले; ट्रम्प म्हणाले…..

Wednesday, 8 April 2026, 8:17
Next Post

Pune : अयोध्येतील राम मंदिर परिसरात नमाज पठणाचा प्रयत्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.