Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी लक्षवेधी प्रश्न मांडणार ; आमदार महेश लांडगे यांची माहिती

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 26 December 2022, 17:43

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील भूसंपादनामुळे बांधित झालेल्या भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आमदार महेश लांडगे विधान सभेत आवाज उठवणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या १२.५ टक्के परताव्याच्या मुद्यावर लक्षवेधी चर्चा लावली असून, शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाकडे भूमिपुत्रांचे लक्ष लागले आहे.

 

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या विकासासाठी प्राधिकरणाने सन १९७२ पासून सन १९८३ पर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत. अशा जमीनधारकांना त्यांच्या संपादित क्षेत्राच्या १२.५ टक्के जमीन परतावा करण्यासाठी पुरेसे क्षेत्र प्राधिकरणाकडे उपलब्ध नाही.

त्यामुळे त्यांच्या संपादित क्षेत्राच्या ६.२ टक्के एवढी जमीन तिच्या मालकास प्राधिकरणाच्या अटींच्या अधिन राहून वाटप करण्यात यावी.

या जमिनीचा परतावा करताना २ चटई क्षेत्र एवढा निर्देशांक मंजूर करण्यात यावा. त्या अनुषंगाने प्राधिकरणाच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये आवश्यक ती सुधारणा करावी, असे निर्देश तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. १ जुलै २०१९ रोजी दिले होते. मात्र, याबाबत अद्याप कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आमदार लांडगे यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्याचे नियोजन केले आहे.

दरम्यान, वास्तविक, राज्यात भाजपाची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधिकरण बाधित भूमिपुत्रांना दिलासा देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात आणि महापालिकेतील प्रशासक राजवटीमध्ये याबाबत कार्यवाही प्रशासनाकडून याबाबत अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. याबाबत आमदार लांडगे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनात राज्य सरकारचे लक्ष पुन्हा वेधणार आहेत.

यावेळी बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले कि, सन १९७२ ते १९८३ या कालावधीत संपादित केलेल्या जमिनींकरीता एकूण १०६ लाभार्थींना २६.०३ आर इतके देय क्षेत्र आहे. प्राधिकारणाने सन १९७२ ते ८३ च्या शेतकऱ्यांसाठी २ चटई क्षेत्र निर्देशांक त्यामधील १५ टक्के वाणिज्य वारासह अनुज्ञेय करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.

पिंपरी-चिंचवडमधील भूमिपुत्रांच्या जमिनी प्राधिकरणाने संपादित केल्या असून, त्याचा परतावा देण्याबाबतचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. प्राधिकरण बांधित भूमिपुत्रांना कायमस्वरुपी दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी आम्ही सभागृहात करणार आहोत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तपासात दिरंगाई अन् आरोपीला संरक्षण! बोकारोतील 28 पोलिसांवर निलंबनाची कारवाई; पिडित कुटुंबाची सीबीआय चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 23:13

“कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याच्या स्तनांकडे बघणं म्हणजे गुन्हा नाही” मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Wednesday, 15 April 2026, 22:51

राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाले नवे अतिरिक्त आयुक्त

Wednesday, 15 April 2026, 22:12

“आम्ही सेवा देणारे, माफिया नाही”; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

Wednesday, 15 April 2026, 21:28

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

Wednesday, 15 April 2026, 20:46

भोंदूबाबा अन् त्याच्या पोलीस पत्नीचा कारनामा! अलौकीक शक्तींच्या नावाखाली मैत्रिणीलाच फसवलं; अघोरी विधी केले, घरात आत्मा आहे सांगितलं अन्…

Wednesday, 15 April 2026, 20:08
Next Post

महावितरणच्या ''या'' चांगल्या कामाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.