Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवले; दोन आरोपींना अटक; चिखली पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 28 May 2025, 18:03

पिंपरी-चिंचवड,(पुणे): चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेलेल्या दोन आरोपींना चिखली पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने (डिटेक्टिव्ह ब्रँच) अटक केली आहे. विशाल प्रभाकर समुखराय (वय – 19, मुळ रा. मु.पो. म्हाळंग्रा, ता. चाकूर, जि. लातुर) व विशाल राजु कांबळे (वय 19, रा. पायगुडेनगर, सुसगाव, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 मे ला चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची घटना घडली होती. त्याबाबत चिखली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची घटना गंभीर असल्याने वरिष्ठांनी दोन्ही मुलींचा शोध घेण्याबाबत सुचना गुन्हे शोध पथकाला दिल्या होत्या.

 

पोलिसांच्या तपासात दोन्ही अल्पवयीन मुली या मैत्रिणी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना एकत्रितरित्या कोणीतरी फुस लावुन पळवून नेले असण्याचा संशय बळावला. त्यादृष्टीने सर्व माहीती घेवून तांत्रीक विश्लेषण करुन यातील अल्पवयीन मुली व आरोपी हे वाशीम जिल्ह्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी (ता.27) आरोपींचा कौशल्यपूर्वक तपास करुन वरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांच्या ताब्यातुन दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे.

मंगळवारी तपास पथक चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना पोलीस हवालदार कबीर पिंजारी यांना एक इसम चोरीचे मोबाईल फोन विकण्यासाठी आला आहे. अशी गोपनीय माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथक यांनी दिगंबर सुनिल साळुंके वय -20, रा. वैष्णवी ओरान्स, बी/703, रिव्हर रेसीडेन्सी रोड, जाधववाडी, चिखली), याला सापळा रचून ताब्यात घेतले.

त्याच्याकडे मिळून आलेल्या मोबाईल बाबत चौकशी केली असता त्याने तुकाईमाता मंदीराजवळ, बाणेर पुणे या ठिकाणी त्याचे साथीदार विशाल राजु कांबळे व विशाल प्रभाकर समुखराव असे तिघांनी मिळून एका परदेशी इसमास अडवुन जबरदस्तीने त्याचा मोबाईल काढून घेतला. त्यानंतर तेथून हंक मोटारसायकलवरुन पळून आणल्याची माहिती दिली. तसेच सदरचा सॅमसंग कंपनीचा एस 24 मोबाईल हा त्याच परदेशी इसमाचा असल्याची कबुली पोलिसांना दिली.

दरम्यान, अरोपीच्या ताब्यातून 72 हजार रुपये किंमतीचा सॅमसंग मोबाईल फोन, एक व्हिडीओ कंपनीचा फोन व गुन्हा केल्यानंतर पळून जाण्यासाठी वापरलेली हंक मोटारसायकल असा 1 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी दिगंबर साळुंके याला पुढील तपासासाठी बाणेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी, चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, अमोल फडतरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण मोगले, सहायक फौजदार राजु जाधव, पोलीस हवालदार अरुण साबळे, कबीर पिंजारी, सुरज सुतार, भास्कर तारळकर, बाबासाहेब गर्जे, मच्छिद्र भांबुरे, राजेश गोडांबे, पोलीस शिपाई नारायण सोमवंशी, संतोष भोर यांनी केली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

BIG BREAKING NEWS : “हा बोत्रे कोण आहे?”; शरद पवारांच्या एका प्रश्नाने साखर उद्योगात खळबळ

Friday, 15 May 2026, 17:47

Mawal Land Scam : मावळात कोट्यवधींच्या जमिनीचा महास्कॅम?; बनावट सरकारी आदेश तयार करून ‘भोगवटादार वर्ग-२’ची जमीनी विकल्या, ६ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 17:20

Mumbai News: “BMCतील वादग्रस्त अधिकाऱ्याचा आणखी एक कारनामा? अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक; महेश पाटील पुन्हा वादाच्या भोवऱ्यात”

Friday, 15 May 2026, 17:12

Hadapsar Bomb Case : “युट्युबवर पाहून बनवला बॉम्बसदृश (IED) ; उपचारासाठी पैशांची गरज, हॉस्पिटलला खंडणीची धमकी देण्याचा कट उघड, पुणे पोलीस आयुक्तांनी केला मोठा खुलासा..”

Friday, 15 May 2026, 16:44

Hadapsar Crime News : हडपसरमध्ये जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला ; हडपसर पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 16:31

Shirur News : शिरूरमध्ये गावठी हातभट्टीवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, लोणी काळभोर येथील एकासह दोघांवर गुन्हा दाखल..

Friday, 15 May 2026, 16:18
Next Post

शेतकऱ्याकडून तीस हजारांची लाच स्वीकारताना महसूलच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक; एसीबीची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.