Tuesday, February 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: बनावट बँक खाते उघडून क्रिप्टोकरन्सीद्वारे पैशांची हेराफेरी, पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची तीन शहरात धडक कारवाई; आरोपी अटकेत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 November 2025, 16:16

प्रतिनिधी अमित मुंडीक

Pune Crime:  पिंपरी-चिंचवड : परिचारीकेच्या नावावर बनावट बँक खाते उघडून त्या खात्यामधून सायबर गुन्हे करत करोड़ोंची आर्थिक हेराफेरी करणाऱ्या तीन जणांना पिंपरी-चिंचवड सायबर (Cyber) पोलिसांनी सांगली, मुंबई आणि अहमदाबाद विमानतळावरून अटक केली आहे. या गुन्ह्याचा मास्टरमाइंड क्रिप्टोकरन्सीद्वारे व्यवहार करून सतत ठिकाण बदलत होता. अखेर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आली. Pune Crime News

हेही वाचा- गरम पाण्याने अंघोळ करताय? सावधान! त्वचेपासून केसांपर्यंत होणारे ‘हे’ मोठे नुकसान तुम्हाला माहीत आहे का?

गुन्हा क्रमांक 42/2025 अंतर्गत फिर्यादी यांना टेलीग्राम वरील 85 SC India Stock Circle या ग्रुपमधून शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 2,10,04,794/- रुपयांची फसवणूक करण्यात आली. अॅडमिन Lata Gupta @GGPPLU2 व इतर हँडल्समार्फत विविध लिंक पाठवून पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडण्यात आले.

तपासादरम्यान फिर्यादींच्या पैशांपैकी 78 लाख रुपये सारस्वत बँक खात्यामध्ये जमा झाल्याचे निष्पन्न झाले. हे खाते सांगली येथील पूनम रफिक शिकलगार हिच्या नावे असल्याचे आढळले. प्राथमिक चौकशीत तिने खाते आपले नसल्याचे सांगितले; परंतु कसून तपासात तिने हे खाते तिच्या मित्र मोहम्मद सईद मोहिउद्दीन पटेल (रा. सांगली) याला दिल्याची कबुली दिली.

मोहम्मद सईदने हे खाते समर गुप्ता याला 12लाख रुपये रोख रकमेच्या व्यवहारात दिल्याची माहिती मिळाली. पुढील तपासात समर गुप्ता हे नाव खोटे असून त्याचे खरे नाव विशाल दिनेश ठक्कर (रा. ठाणे) असल्याचे समोर आले. विशाल ठक्कर हा क्रिप्टोकरन्सीमार्फत (Binance USDT) व्यवहार करून खात्यांचा वापर करत असल्याचे स्पष्ट झाले.

विशाल ठक्करच्या माध्यमातून तपास मास्टरमाइंड फॉर्च्युन पर्यंत पोहोचला. तो वाराणसीहून अहमदाबादला विमानाने येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायबर पोलिसांनी अहमदाबाद विमानतळावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे खरे नाव हर्ष सुरेंद्रप्रताप भदोरिया (रा. कानपूर, उत्तर प्रदेश) असल्याचे समोर आले. देशभरातील किमान 26 नागरिकांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे समोर आली आहे. मोहम्मद सईद मोहिउद्दीन पटेल ( वय25), रा. सांगली, विशाल दिनेश ठक्कर उर्फ समर गुप्ता, वय (28), रा. ठाणे, हर्ष सुरेंद्रप्रताप भदोरिया उर्फ फॉर्च्युन, वय (32), रा. कानपूर अशी आरोपींची ओळख आहे. आरोपींकडून एकूण 6 मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून ₹39,62,315/- रुपये होल्ड करण्यात आले आहेत.

ही कारवाई मा. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व सायबर पोलीस पथकाने केली. न्यायालयीन प्रक्रियेत सरकारी अभियोक्ता सुरत मोहिते यांनी सहकार्य केले.

सायबर पोलिसांच्या तात्काळ व कौशल्यपूर्ण कारवाईमुळे या मोठ्या फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश झाला असून पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune Accident: कात्रज-नवले पूल परिसरात भीषण अपघात; ट्रकची बसला जोरदार धडक, चालकाचा जागीच मृत्यू

Tuesday, 24 February 2026, 9:33

Pune News: पोलीस आले, पळा…! पुण्यात स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; घाबरलेल्या तरुणीची खिडकीतून उडी अन् जागीच मृत्यू

Tuesday, 24 February 2026, 9:14

Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! पंडित प्रदीप मिश्रांच्या कथेनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ मार्ग राहतील बंद

Tuesday, 24 February 2026, 8:52

एअर अ‍ॅम्ब्युलन्स कोसळून रुग्ण आणि डॉक्टरांसह 7 जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं? वाचा

Tuesday, 24 February 2026, 7:50

Pune Weather: पुण्यात पहाटे गारवा अन् दुपारी उन्हाचे चटके; कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

Tuesday, 24 February 2026, 7:34

Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस? वाचा, आजचे राशीभविष्य

Tuesday, 24 February 2026, 7:26
Next Post
Big news..! Ajit Pawar's party mourns! A brave worker committed suicide; Because in front of...

मोठी बातमी..! राष्ट्रवादी कॉंग्रेसवर शोककळा! धडाडीच्या कार्यकर्त्याने केली आत्महत्या; कारण समोर... 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.