Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महापालिका शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता ‘धन्वंतरी’चा लाभ! शिक्षक दिनाच्या पूर्वसंधेला आयुक्त शेखर सिंह यांची ‘भेट’

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 5 September 2023, 11:48

पिंपरी, ता.०५ : पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागात काम करणारे प्राथमिक शिक्षक आणि सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना धन्वंतरी आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी घेतला. त्यामुळे शिक्षक दिनाच्या पूर्वसंधेलाच शिक्षकांना अनोखे ‘गिफ्ट’ मिळाले.

गेल्या आठ- दहा वर्षांपासून महापालिकेतील प्राथमिक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना अन्य विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे ‘धन्वंतरी’ योजना लागू करावी. यासाठी शिक्षक संघटनांनी मागणी लावून धरली होती. याबाबत आयुक्त शेखर सिंह आणि संघनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यावी आणि सकारात्मक तोडगा काढावा, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली. त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

दरम्यान, महापालिका भवन येथे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी शिक्षक संघटना आणि शिक्षण व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजय खोराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र वादेवार, पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, शिक्षक संघटनेचे प्रा. मनोज मराठे आदी उपस्थित होते.

 

महापालिकेच्या इतर विभागातील कर्मचारी/ अधिकारी यांच्याप्रमाणे प्राथमिक शिक्षण विभागाकडील कार्यरत शिक्षक / सेवानिवृत्त शिक्षकांना कार्यरत शिक्षकास ३०० रुपये व सेवानिवृत्त शिक्षकांस १५० रुपये मासिक सभासद वर्गणी कपात करण्यात येईल.

त्याआधारे संबंधित कर्मचाऱ्यांना धन्वंतरी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी २०१३ च्या धन्वंतरी स्वास्थ योजनेच्या धोरणामध्ये बदल करणेकामी वैद्यकीय विभागामार्फत मा. स्थायी समिती, मा. महापालिका सभा यांची मान्यता घेण्याकामी कार्यवाही प्रस्तावित करावी, असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.

 

महापालिका शिक्षकांना धन्वंतरी योजनेचा लाभ मिळावा. या करिता गेल्या आठ ते दहा वर्षांपासून शिक्षक संघटना मागणी करीत आहेत. याबाबत अनेकदा प्रशासनाकडे आम्ही पाठपुरावा केला आहे. शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाकडून ‘गिफ्ट’ मिळाले असून, यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि सहकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच, महापालिका शिक्षक आणि सेवानिवृत्तांचे अभिनंदन करतो.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36
Next Post

Pune News : 'बीआरटी' मार्गात घुसखोरी करताय? दंडात्मक कारवाई होईल; वारंवार चूक केल्यास परवानाच होईल रद्द!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.