Wednesday, September 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरीत थरारक राडा! “तुला आज जिवंत सोडत नाही…” म्हणत तरुणावर पिस्तूलातून थेट गोळीबार; रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तरुण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 14 September 2026, 22:16

पिंपरी-चिंचवड : जाधववाडी परिसरात जुन्या आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून एका तरुणावर पिस्तूलातून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. जाधववाडी येथील ओलियो हॉटेलजवळ सोमवारी (१४ सप्टेंबर) पहाटे हा प्रकार घडला. या प्रकरणी चिखली पोलिसांनी काही तासांत दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून पिस्तूल, वाहन आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी धनाजी घोगरे (३५) हे पहाटे सव्वादोनच्या सुमारास ओलियो हॉटेलजवळ आले होते. त्यावेळी स्वप्नील कांताराम जाधव आणि त्याचा चालक रोशन पिंगळे हे तेथे उपस्थित होते. पूर्वीच्या वादातून तसेच आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणावरून रवी घोगरे आणि दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. वाद वाढल्यानंतर स्वप्नील जाधव याने घोगरे यांना धमकी देत पिस्तूलातून त्यांच्या दिशेने गोळी झाडल्याचा आरोप आहे.

गोळीबारात रवी घोगरे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तपासाला वेग दिला. घोगरे यांच्या फिर्यादीवरून स्वप्नील जाधव आणि रोशन पिंगळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल, वाहन आणि मोबाईल फोन जप्त केला आहे.

 

या गोळीबाराच्या घटनेमुळे जाधववाडी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

UPI युजर्ससाठी मोठी बातमी! २ हजारांवरील व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट लागू; नवे नियम जाहीर

Tuesday, 15 September 2026, 23:00

ज्येष्ठा गौरींच्या आगमनाचा मुहूर्त कोणता? जाणून घ्या आवाहन, पूजन आणि विसर्जनाची योग्य वेळ

Tuesday, 15 September 2026, 21:53

सिंहगड रोड पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व काडतूसासह सराईत अटकेत

Tuesday, 15 September 2026, 21:11

सोलापूर जिल्ह्यात हळहळ! उजनी कालव्यात बुडून दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; वसतिगृहाच्या कारभारावर कुटुंबीयांचा तीव्र संताप

Tuesday, 15 September 2026, 20:31

राज्यातील शाळांमध्ये २८ हजारांहून अधिक शिक्षकेतर पदे भरण्यास मंजुरी; नवीन नियम जाहीर

Tuesday, 15 September 2026, 19:40

सहकारी साखर कारखान्यांसाठी सरकार मैदानात; मोठ्या निर्णयामुळे कारखान्यांना मिळणार बळ!

Tuesday, 15 September 2026, 19:11
Next Post

स्वतःच्याच कुटुंबाने फिरवली पाठ! विजयाची स्वप्नं पाहणाऱ्या भाजप उमेदवाराला निवडणुकीत मिळालं केवळ ‘एकच’ मत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp