Wednesday, September 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोलापूर जिल्ह्यात हळहळ! उजनी कालव्यात बुडून दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; वसतिगृहाच्या कारभारावर कुटुंबीयांचा तीव्र संताप

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 15 September 2026, 20:31

सोलापूर: पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी येथे उजनी उजव्या कालव्यात बुडून दहावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समर्थ नागनाथ बोबडे (वय १६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. समर्थ हा केसकरवाडी येथील शिवराम केसकर मागासवर्गीय निवासी वसतिगृहात राहून दहावीचे शिक्षण घेत होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी समर्थ काही मित्रांसोबत वसतिगृहाजवळील उजनी उजव्या कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेला होता. कपडे धुत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो कालव्यातील वेगवान पाण्याच्या प्रवाहात पडला. पाण्याचा अंदाज न आल्याने समर्थ प्रवाहासोबत वाहून गेला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड करून मदतीसाठी प्रयत्न केले. मात्र, पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने समर्थला वाचवता आले नाही.

या घटनेनंतर समर्थचे वडील नागनाथ प्रभाकर बोबडे यांनी वसतिगृह प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवासी वसतिगृहात राहणारा अल्पवयीन विद्यार्थी बाहेर कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेला असताना सुरक्षा रक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे त्याच्याकडे लक्ष का नव्हते, असा सवाल त्यांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच वसतिगृह चालक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोष आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बोबडे यांनी केली आहे. दरम्यान, समर्थच्या मृत्यूमुळे बोबडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या प्रकरणी पोलीस आणि संबंधित विभागाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

UPI युजर्ससाठी मोठी बातमी! २ हजारांवरील व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट लागू; नवे नियम जाहीर

Tuesday, 15 September 2026, 23:00

ज्येष्ठा गौरींच्या आगमनाचा मुहूर्त कोणता? जाणून घ्या आवाहन, पूजन आणि विसर्जनाची योग्य वेळ

Tuesday, 15 September 2026, 21:53

सिंहगड रोड पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व काडतूसासह सराईत अटकेत

Tuesday, 15 September 2026, 21:11

सोलापूर जिल्ह्यात हळहळ! उजनी कालव्यात बुडून दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; वसतिगृहाच्या कारभारावर कुटुंबीयांचा तीव्र संताप

Tuesday, 15 September 2026, 20:31

राज्यातील शाळांमध्ये २८ हजारांहून अधिक शिक्षकेतर पदे भरण्यास मंजुरी; नवीन नियम जाहीर

Tuesday, 15 September 2026, 19:40

सहकारी साखर कारखान्यांसाठी सरकार मैदानात; मोठ्या निर्णयामुळे कारखान्यांना मिळणार बळ!

Tuesday, 15 September 2026, 19:11
Next Post

सिंहगड रोड पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व काडतूसासह सराईत अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp