Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शौर्य जागरण यात्रेचे क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्यावतीने जंगी स्वागत

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 4 October 2023, 18:55

प्रदीप गांधलीकर
पिंपरी, ता.०४ : विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित शौर्य जागरण यात्रेचे चिंचवडगाव येथे क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने बुधवारी (ता.४) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, विश्व हिंदू परिषद प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, भाजपा जिल्हा अध्यक्ष शंकर जगताप, आमदार उमा खापरे, विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री धनंजय गावडे, अशोक यलमार, विजय देशपांडे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, डॉ. शकुंतला बन्सल, नितीन बारणे, राहुल बनगोंडे, आरती शिवणीकर, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित शाळांमधील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासह विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे ३५०वे वर्ष आणि विश्व हिंदू परिषद स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष अशा दोन्ही घटनांचे औचित्य साधून संपूर्ण भारतातून आयोजित करण्यात आलेल्या या शौर्य जागरण यात्रेचे बुधवारी (ता.४) सकाळी ९:३० वाजता इंद्रायणीनगर – संत तुकारामनगर – आकुर्डी या मार्गाने सायंकाळी पाच वाजता चिंचवडगावात आगमन झाले.

 

दरम्यान, छत्रपती श्री शिवाजीमहाराज यांचा सिंहासनारूढ असलेला भव्य पुतळा रथावर पुष्पमालांनी सजवलेला होता. ढोलताशा आणि मंगल वाद्ये यांचा गजर आणि उपस्थितांनी ‘छत्रपती शिवाजीमहाराज’ , ‘छत्रपती संभाजीमहाराज’ , ‘राजमाता जिजाऊ माँसाहेब’ यांचा जयघोष करीत रथावर पुष्पवृष्टी केली.

यावेळी बोलताना गिरीश प्रभुणे यांनी, “क्रांतिवीर चापेकर बंधूंनी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन हौताम्य पत्करले. या शौर्य जागरण यात्रेची प्रेरणा आपल्या घराघरांत पोहोचली पाहिजे. भावी पिढीला सक्षम, देशाभिमानी आणि स्वाभिमानी करण्यासाठी ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा आणि शिवचरित्र यांची पारायणे झाली पाहिजेत!” असे विचार मांडले. त्यानंतर समर्थ रामदासस्वामी रचित “शिवरायांचे आठवावे रूप…” या कवनाचे सामुदायिक गायन क्रांतिवीर चापेकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53

व्हाट्सअँप डीपीवर कंपनी संचालकाचा फोटो लावून 20 लाखांची फसवणूक; राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 25 July 2026, 20:42
Next Post
Govt hikes Ujjwala subsidy from Rs 200 to Rs 300 per refill

उज्ज्वला लाभार्थ्यांना सर्वात मोठा दिलासा, आता 300 रुपयांची सबसिडी मिळणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.