Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri-Chinchwad News: “मला मोटू का म्हणाला?” शाळेबाहेर चिडवण्यावरून विद्यार्थ्यांमध्ये वाद; मित्राने बदला घेत केलं भयंकर कृत्य

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 8 July 2025, 18:01

पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर परिसरात एका शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांमध्ये झालेला किरकोळ वाद थेट हिंसक हल्ल्यापर्यंत गेला आहे. ‘मोटू का म्हणालास’ या एका सामान्य वाटणाऱ्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या वादाने गंभीर वळण घेतलं आणि मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या एका निष्पाप विद्यार्थ्यावर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला.

ही घटना मंगळवारी दुपारी सुमारास विभग्योर शाळेबाहेर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दोन विद्यार्थ्यांमध्ये ‘मोटू’ असा शब्द वापरल्यामुळे वाद निर्माण झाला होता. या अपमानाचा बदला घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांपैकी एकाने आपल्या भावासोबत आणखी तिघांना बोलावून शाळेबाहेर तयारीने थांबला होता. त्यांनी चिडवणाऱ्या मुलाला अडवत त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर हस्तक्षेप करण्यासाठी एका विद्यार्थ्याने मध्यस्थी केली, मात्र हाच विद्यार्थी या साऱ्या गोंधळात बळी ठरला. अचानक त्याच्यावर धारधार शस्त्राने डोक्यावर, मानेवर आणि हातावर हल्ला केला गेला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याच्या जखमांना टाके पडले असून तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगवी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतलं असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला हा वाद इतका टोकाचा जाईल याची कुणालाही कल्पना नव्हती. त्यामुळे मुलांच्या वागणुकीकडे पालक आणि शाळा प्रशासनाने अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post

पुण्यातील ढोल-ताशा पथकांसाठी काँग्रेसकडून महापालिकेला निवेदन; केली 'ही' मागणी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp