Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत फुटपाथवरून गाड्या चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; पोलीस निरीक्षक ऍक्शन मोडवर

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 2 April 2025, 15:03

बारामती दि.02: बारामती शहरातील पादचाऱ्यांसाठी बांधलेल्या फुटपाथचा गैरवापर करणाऱ्या वाहनचालकांना आता मोठा दंड भरावा लागणार आहे. याबाबत वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव ऍक्शन मोडवर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सूचनांनुसार, वाहतूक पोलिसांनी आता कठोर कारवाई सुरू केली आहे.

भिगवण रोड आणि विद्या प्रतिष्ठान परिसरात पादचाऱ्यांसाठी प्रशस्त, सुशोभित फुटपाथ बांधण्यात आले आहेत. मात्र, काही वाहनचालक आपली सोय बघत थेट फुटपाथवर गाड्या घालतात आणि पार्किंगसाठी याचा गैरवापर करतात. यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षित मार्गाचा वापर करता येत नाही. ही बाब गांभीर्याने घेत वाहतूक पोलिसांनी अशा बेजबाबदार वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम राबवली. आतापर्यंत 17 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून 9 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

बारामतीत येणाऱ्या हजारो वाहनांना वाहतूक नियमावलीचे धडे देण्यासाठी बारामती वाहतूक शाखेने आत्तापर्यंत अनेक नवनवीन संकल्पना आणि उपाययोजना राबवल्या आहेत. मात्र तरीही काही नागरिक आणि वाहनचालक आपली जबाबदारी झटकून टाकतात. आपल्या शहराला शिस्तबद्ध आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. इथून पुढच्या काळातही ही मोहीम अधिक कडक केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी स्पष्ट केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान सुभाष काळे, प्रदीप काळे अजिंक्य कदम, प्रज्योत चव्हाण, रेशमा काळे सीमा साबळे यांनी केली आहे.

 तर अशांवर होणार कडक कारवाई

फुटपाथ नागरिकांना चालण्यासाठी आहे, गाड्यांसाठी नव्हे, जर कोणी फुटपाथवर वाहन चालवत असेल किंवा वाहन पार्क करत असेल, तर नागरिकांनी तातडीने 9923630652 या क्रमांकावर कळवावे. संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट!लता, सुशील हगवणे आणि नीलेश चव्हाण यांना कोर्टाचा दिलासा,कडक अटी शर्थीसह जामीन…

Friday, 6 November 2026, 11:06

रुग्णालयाचा पत्ता विचारायचा बहाणा अन् विद्यार्थ्याचा मोबाईल हिसकावला एमआयटी कॉलेजजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांचा धुमाकूळ

Friday, 6 November 2026, 10:49

पुण्यात स्वाइन फ्लूचा कहर! तब्बल 879 रुग्णांची नोंद,आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली…

Friday, 6 November 2026, 10:39

पोलीस भरती घोटाळा उघड करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; ऑडिओ क्लिपने खळबळ, घोटाळ्याचे धागेदोरे कुठंपर्यत?

Friday, 6 November 2026, 10:23

दोन वर्षांसाठी पुण्यातून हद्दपार, तरीही परतला! वाघोलीत कोयते घेऊन दहशत माजवणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

Friday, 6 November 2026, 10:20

दिवाळीच्या आनंदावर अपघाताचं विरजण! घराकडे निघालेल्या पोलीस प्रशिक्षणार्थींच्या बसला अपघात, 15 जण जखमी

Friday, 6 November 2026, 10:14
Next Post
Pune engg student held for ‘supporting Pak’ on social media

किरकोळ अपघातानंतर चावी काढून घेतल्याबद्दल तिघांविरुद्ध गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp